पुणे । नगर सहयाद्री:-
गेल्या काही दिवसांपासून थंडी कमी होत असल्याचे चित्र आहे, तर दिवस जसा सरेल तसा उष्माचा पारा वाढताना दिसत आहे. यामुळे पहाटे काहीशी थंडी तर दुपारी कडक उन्ह अशी एकूण परिस्थिती झाली आहे. यामुळे ऐन थंडीच्या दिवसात उन्हाचे चटके बसण्यास आत्तापासूनच सुरुवात झाली आहे.
अशात!ल कमाल-किमान तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे उष्मा अधिक जाणवू लागला आहे. मुळात फेब्रुवारी महिना हा थंडीच्याच दिवसांचा महिना समजला जातो. या महिन्यात थंडी कायम राहत असते.
मात्र, आत्ताची परिस्थिती पूर्णपणे वेगळी असून कधी थंडीत काहीशी वाढ तर कधी थंडी एकदम कमी होत आहे. तसेच दुपारच्या वेळी उन्हाळा पार वाढल्याचे दिसते. अशी संमिश्र परिस्थिती सध्या पाहिला मिळत आहे. मुंबईत परिस्थिती पूर्ण वेगळी असून तिथे तापमानात घट झाली असल्याचे दिसते. मुंबईप्रमाणेच निफाडमध्येही पारा 08 अंशावर गेल्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज सांगता येणे कठीण झाले आहे.
उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि पुण्यात किमान तापमानात 2-4 अंश सेल्सिअने घट होणार असल्याची शक्यता हवामान खात्यातील तज्ज्ञांनकडून वर्तवण्यात आली आहे. उत्तरेकडील वारे उत्तर-मध्य महाराष्ट्रात, विदर्भासह उर्वरित क्षेत्रात प्रवेश करणार आहेत. यामुळे बुधवारी रात्रीपासूनच 14 फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत हे वारे राज्यात शिरकाव करणार आहे. परिणामी रात्रीच्या तापमानात घट होणार असल्याचे सांगितले जात आहे.