spot_img
अहमदनगरआई वडिलांच्या कष्टाच चीज झालं! तीन बहिणींसह भाऊ पोलीस दलात..

आई वडिलांच्या कष्टाच चीज झालं! तीन बहिणींसह भाऊ पोलीस दलात..

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
गरीबी पाचवीलाच पुजलेली. काम करेल तेव्हा चूल पेटायची अशा परिस्थिती, घरात शिक्षणाचा कसलाही गंध नसताना हलाखीच्या परिस्थितीत वाट काढत परिस्थितीचा बाऊ न करता आलेल्या संकटाना सामोरे जात परिस्थितीला जिद्द बनवत एकाच कुटुंबातील तीन बहिणी आणि एक भाऊ पोलिस दलात भरती झाल्याने गावामध्ये व पंचक्रोशी मध्ये या कुटुंबाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

सोनाली अंकुश मोटे पुणे ग्रामीण पोलीस, रुपाली अंकुश मोटे अहमदनगर पोलीस, रोहिणी अंकुश मोटे मुंबई शहर पोलिस, ज्ञानेश्वर अंकुश मोटे पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती झाल्याने आई वडिलांच्या कष्टाचे चीज झाले. कर्जत तालुक्यातील सुपा रहिवासी असलेल्या अंकुशराव मोटे यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची. घरी थोडीफार शेती असताना दुष्काळी परिस्थितीमुळे पुर्णपणे बेभरवशाची असायची अशा परिस्थिती मध्ये मिळेल ते काम करून मोल मजुरी करून प्रपंच चालवला.

एक अशिक्षित घर म्हणून मोटे कुटुंबाकडे पाहिले जायचे. तीन मुली आणि एक मुलगा असे चौघेजण लहान पणापासून अभ्यासात हुशार असल्याने अंकुशराव मोटे आणि त्यांची पत्नी सौ कमलबाई मोटे यांनी मुलांच्या शिक्षणासाठी मोलमजुरी करून परिस्थितीवर मात करत उच्च शिक्षित केले. मुलांनी देखील आई वडिलांच्या कष्टाचे चीज करत चौघेही पोलीस दलात भरती झाले. यातील सोनाली मोटे या २०१२ साली पोलिस दलात भरती होऊन पुणे ग्रामीण पोलीस दलात काम करत आहेत.

रुपाली मोटे आणि रोहिणी मोटे या २०१७ साली एकाच वेळी पोलिस दलात भरती होऊन रुपाली मोटे या अहमदनगर पोलीस दलात तर रोहिणी मोटे या मुंबई शहर पोलिस दलात काम करत असतानाच नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीमध्ये त्यांचा सर्वात लहान भाऊ ज्ञानेश्वर मोटे हा पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती झाला. चौघे बहिण भाऊ पोलिस दलात भरती झाल्याने गावामध्ये या कुटुंबाची वेगळी ओळख निर्माण झाली असून मुलांच्या या यशामुळे आई वडिलांची मान उंचावली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...

मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द करा; रयतच्या कार्यालयासमोर पालकांचे धरणे आंदोलन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक...

उद्धव-राज एकत्र येणार; पाच जुलैला मुंबईत..

मुंबई । नगर सहयाद्री  महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा पाहून देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा...

जामखेडमध्ये धक्कादायक प्रकार! पुन्हा एका बालकाचा मृत्यू; आठ दिवसांतील तिसरी घटना..

जामखेड । नगर सहयाद्री:- क्रिकेट खेळताना स्लॅबवरती गेलेला बॉल फ्लेसच्या लोखंडी पाईपने काढत असताना घरावरील...