spot_img
ब्रेकिंगहातचलाखी पडली महागात; दोन महिला जेरबंद, नेमकं प्रकरण काय?

हातचलाखी पडली महागात; दोन महिला जेरबंद, नेमकं प्रकरण काय?

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
दिपावली सणाच्या काळात कर्जत जिल्ह्यात सराफ व्यवसायीकांचे दुकाने आणि प्रवाशांचे लक्ष विचलित करून दागिने चोरी करणार्‍या महिलांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. पथकणारे कारवाईत ५० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने हस्तगत केले आहे.

कर्जत शहरातील साई ज्वेलर्समधून दोन अनोळखी महिलांनी हातचलाखीने 38 हजार रुपये किमतीचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सराफ व्यावसाईक हरिओम बापु मैड (रा. गदादेनगर, कर्जत ) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरु केला.

आरोपींची माहिती काढत असतांना पथकास बीड जिल्ह्यातील महिलांनी सदरचा गुन्हा केला असून त्यातील दोन महिला या पुन्हा चोरी करण्यासाठी जामखेड बस स्टँड परिसरामध्ये आलेल्या असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पथकाने जामखेड परिसरात सापळा रचून दोन महिलांना जेरबंद केले .

त्याच्याकडून ५० हजार रुपये किंमतीचे चांदीची दागिने हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात शांताबाई राधाकिसन जाधव (वय ५५, हिवरसिंगा, शिरुर, बीड), निलावती लक्ष्मण केंगार (वय ५२, मुर्शदपुर, बीड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून र्जत पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मंत्री विखे पाटील यांचे संगमनेर तालुक्‍यातील कार्यकर्त्‍यांना मोठे अवाहन; स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या निवडणूकीतही..

संगमनेर । नगर सहयाद्री:- आपल्‍या सर्वांच्‍या योगदानामुळे राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार सत्‍तेवर आले. लोकांसाठी...

केडगावमध्ये अवजडचा पोरखेळ; बॅरिकेट चुकीच्या ठिकाणी टाकल्याने नारिकांना त्रास

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जेएलपी टॉवर लिंक रोड, भूषणनगर तू गहिले दूध डेअरी दरम्यान...

बच्चू कडूंचे आंदोलन पेटले; समृद्धी मार्गावर टायर जाळले, मागण्या काय?

नागपूर । नगर सहयाद्री:- शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कर्जमुक्तीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी...

धुरळा उडणार, तयारीला लागा! कधी लागणार आचारसंहिता?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. पाच...