मुंबई / नगर सह्याद्री : लग्न समारंभ म्हटलं की मानापमान, रुसवे-फुगवे या गोष्टी असतात. असे असले तरी लग्न कार्य व्यवस्थित पार पाडण्यावर सर्वांचाच भर असतो. पण आता एका लग्नात जेवणावरूनच राडा झाला असल्याचे समोर आले आहे.
एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात लग्नात जेवणावरून, पनीरवरून मोठा राडा झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. साध्या मुद्यावरून सुरू झालेला वाद बघता, बघता एवढा पेटला की लग्न मंडपाला अगदी मोठ्या राड्यात रूपांतर झाले. एका लग्नातील जेवणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
त्या व्हिडीओमध्ये लग्नासाठी आलेली लोकं एकमेकांवर खुर्च्या फेकताना, मारामारी करताना दिसत आहेत. तर काही लोकांनी एकमेकांची थेट कॉलरच पकडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये मटर-पनीरच्या भाजीवरून राडा झाला. वर आणि वधू या दोघांकडचे नातेवाईक एकमेकांसमोर आले आणि त्यांच्यात वाद सुरू झाला.
मटरपनीरची भाजी मिळाली नाही म्हणून ते एकमेकांवर धावून गेले आणि त्यांच्यातील वाद पेटला. थोड्या वेळाने तर त्यांचं भांडण एवढं टोकाला गेलं की मारहाण सुरू झाली. काहींनी तर एकमेकांवर खुर्च्याच फेकून मारल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.