spot_img
ब्रेकिंगLadki Bahin Yojana: वर्षांचा शेवटी सरकारचा डबल धमाका!; लाडक्या बहि‍णींना काय मिळणार...

Ladki Bahin Yojana: वर्षांचा शेवटी सरकारचा डबल धमाका!; लाडक्या बहि‍णींना काय मिळणार मोफत? वाचा..

spot_img

Annapurna Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. आता महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ३ मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहेत.महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये दिले जातात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना वर्षातून ३ घरगुती सिलिंडर मोफत मिळणार आहे.

ज्या महिलांच्या नावावर गॅस सिलिंडरची कनेक्शन आहे. त्यांनाच या योजनेअंतर्गत मोफत सिलिंडर मिळतात. त्यामुळे आता ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन नाही त्यांना ते करुन घेण्याची सुवर्णसंधी आहे.

अनेक पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन नाही त्या ते स्वतः च्या नावावर करु शकतात. याच पार्श्वभूमीवर आता तुम्ही तुमच्या घराजवळील गॅस एजन्सीमधून तुमच्या नावावर गॅस कनेक्शन घेऊ शकतात.

योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत दिले जातात. यामध्ये लाडक्या बहिणींनादेखील सिलिंडर मिळणार आहे. परंतु अनेक महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन नसल्याने त्यांना योजनेचा लाभ घेता येत नाही. सोलापूरमधील तब्बल अडीच लाख महिला अन्नपूर्णा योजनेपासून लांब आहेत.

तुम्ही जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन साध्या कागदावर अर्ज करुन गॅस कनेक्शनवरील नाव बदलू शकतात. तुम्हाला फक्त एका साध्या कागदावर अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुमचे नाव बदलेल. यानंतर महिलांना योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहे. सुरुवातीला लाभार्थी महिलांना संपूर्ण पैसे द्यावे लागणार आहे त्यानंतर शासनाचे अनुदान तुमच्या खात्यात जमा केले जाईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडू नका; मंत्री धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

Politics News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये धनजंय...

साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक; गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शिर्डी । नगर सहयाद्री:- भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक होत असल्याचा...

‘पारनेरला शनिवारी राष्ट्रवादीचा मेळावा’; कोण राहणार उपस्थित?

तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...

‘कष्टाचे दाम मिळविण्यासाठी बळीराजाचा संघर्ष’

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील बाजारात भाज्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य समाधान व्यक्त करत...