spot_img
अहमदनगरइंदोरप्रमाणे नगरला स्वच्छ सुंदर करणे हाच ध्यास : आ.संग्राम जगताप

इंदोरप्रमाणे नगरला स्वच्छ सुंदर करणे हाच ध्यास : आ.संग्राम जगताप

spot_img

सलग तिसऱ्या दिवशी शहरात डीप क्लीन स्वच्छता मोहीमेमुळे परिसर चकाचक
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
नगर शहराला जसे विकासाच्या दिशेने मी नेत आहे तसेच आता आपल्या नगरला स्वच्छ व सुंदर शहराचा दर्जा मिळवून द्यायचा आहे. देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळख असलेल्या इंदोर शहराचा आदर्श घेऊन त्या शहराप्रमाणे आपल्या नगरला स्वच्छ सुंदर करणे हाच ध्यास व उद्देश आहे. नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होत आपले घर, परिसर, कॉलनी व प्रभाग स्वच्छ व सुंदर ठेवल्यास हे उद्दिष्ट गाठणे सहज शक्य होईल. आता डीप किल्न मोहिमेमुळे शहर स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. यापुढील काळात जे रस्त्यवर कचरा टाकतील त्यांच्यावर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी कचरा घंटागाडीतच टाकून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आ.संग्राम जगताप यांनी करून येणाऱ्या काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुका व या स्वच्छता अभियानाचा काही एक संबध नाही, असेही आ.संग्राम जगताप यांनी स्पष्ट केले.

अहिल्यानगर शहराच्या डीप क्लीन स्वच्छता मोहिमेसाठी आ.संग्राम जगताप यांनी पुढाकार घेत आग्रही भूमिका घेतली आहे. या मोहिमे अंतर्गत सोमवारी सकाळ पासून शक्कर चौक ते कोठला या भागात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यासाठी आ.जगताप सकळी ७ वाजल्यापासून उपस्थित होत मनपाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सूचना व आदेश दिले. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे व परिसरातील माजी नगरसेवक, समाजिक कार्यकर्ते व नागरिक यांच्यासह मनापाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी शक्कर चौकातील रस्त्यामधील दुभाजकांच्या कडेला व खालील माती व कचरा साफ करण्यात आला. तसेच बंद गटारीचे चेंबर उघडून त्यातील गाळ, माती, मोठे दगडं काढून स्वच्छता करण्यात आली. रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडे, गावात काढून अतिक्रमणे व टपऱ्याही काढण्यात आल्या. या विशेष अभियानामुळे शक्कर चौक ते कोठला रोड परिसर स्वच्छ व चकाचक झाल्याने परिसरातील नागरिकांनी मोठे समाधान व्यक्त केले.

यावेळी आयुक्त यशवंत डांगे यांनी आवाहन केले की, ज्या नागरिकांचे रस्त्यंवर अतिक्रमणे आहेत ते त्यांनी स्वतःहून काढून घ्यावेत अन्यथा महानगरपालिका त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहे. तसेच रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवरही कठोर कारवाई करणार आहोत. शहराच्या स्वच्छतेसाठी सर्व नागरिकांनी मनपाला सहकार्य करावे.

यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक संजय चोपडा व प्रकाश भागानगरे, कमलेश भंडारी, गोरख पडोळे, उपायुक्त संतोष इंगळे, प्रभाग अधिकारी एस. बी. तडवी आदींसह नागरिक या मोहिमेत सहभागी झाले होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...

पीएम किसान योजना; ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पैसे, काय कारण पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - PM Kisan Yojana : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान...

उमेदवारीसाठी इच्छुक राष्ट्रवादीच्या दारी; कोणी कोणी दिल्या मुलाखती…

२०० जणांनी दिले अर्ज; भाजप-राष्ट्रवादी युतीच्या संकेतांनंतर हालचाली वेगवान अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी महापालिका निवडणुकीसाठी...