spot_img
अहमदनगरपारनेरच्या वैभवात भर पडणार; आमदार दातेंनी केले 'या' कामाचे भूमिपूजन

पारनेरच्या वैभवात भर पडणार; आमदार दातेंनी केले ‘या’ कामाचे भूमिपूजन

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
गेल्या अनेक वर्षांपासून पारनेर बस स्थानकाचा प्रश्न प्रलंबित होता शासन स्तरावर पाठपुरावा करून या बस स्थानकासाठी निधी प्राप्त झाला आहे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हा प्रश्न मार्गी लागला आहे पारनेर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी आता स्मार्ट बस स्थानक नक्कीच उभे राहील असे मत आमदार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केले.

पारनेर येथील बसस्थानकाच्या पुनर्बांधणी कामाचे भूमिपूजन आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते करण्यात झाले. महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांतून या प्रकल्पासाठी 2 कोटी 66 लाख 50 हजार 875 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या अद्यावत बसस्थानकाच्या इमारतीमुळे पारनेर शहराच्या वैभवात भर पडणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पारनेर बसस्थानकाची दुरवस्था नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली होती. सर्व सुविधांनी युक्त अशी आधुनिक इमारत उभारण्याची तालुक्यातील नागरिकांची दीर्घकालीन मागणी होती. आमदार काशिनाथ दाते यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करून निधी मंजूर करवला. या नवीन इमारतीमुळे प्रवाशांना आधुनिक सुविधांचा लाभ होणार असून, शहराच्या सौंदर्यातही भर पडेल.

या भूमिपूजन सोहळ्यास जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अशोक सावंत, भाजप नेते विश्वनाथ कोरडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, ज्येष्ठ नेते वसंत चेडे, सुभाषराव दुधाडे, भास्कर उचाळे, अर्पणा खामकर, नगरसेवक युवराज पठारे, कांतीलाल ठाणगे, अशोक चेडे, सरपंच लहू भालेकर, मनोज मुंगसे, विकास पवार, उद्योजक मंगेश औटी, राजू औटी, सोनाबाई चौधरी, उपअभियंता काळभोर, आगार प्रमुख प्रशांत काळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राज्य परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार! एका कारणामुळं शिक्षिकेची पदोन्नती रद्द; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला...

पारनेर तालुक्यात पिकांचा बनावट पंचनामा; सखोल चौकशीची मागणी

पिंपरी पठार, वेसदऱ्यात लाभार्थ्यांची बोगस यादी: सरपंच शिंदे पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पिंपरी...

राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचं अखेर ठरलं, जागावाटपाबाबत मोठी माहिती समोर!

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मनसेचे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात...

सरपंच संजय रोकडे यांची आक्रमक भूमिका; ग्रामस्थांसह ‘या’ कामांसाठी करणार उपोषण..

पारनेर । नगर सहयाद्री:- वडगाव सावताळ ते गाजदिपूर या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी...