spot_img
अहमदनगरमुलगी एकटी होती, आईच्या बॉयफ्रेंडन दार बंद केलं अन्..; नगर शहरातील खळबळजनक...

मुलगी एकटी होती, आईच्या बॉयफ्रेंडन दार बंद केलं अन्..; नगर शहरातील खळबळजनक घटना

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
राज्यात दररोज महिला अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्याचा गंभीर घटना समोर येत असून यामध्ये नातलगांनी किंवा ओळखीच्या व्यक्तींच संधीचा फायदा घेत असल्याचे खळबळजनक प्रकार समोर येत आहे. अशीच एक घटना नगर शहरात घडली.

केडगाव परिसरात आईच्या प्रियकराने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत भर दिवसा लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आईच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैजनाथ बबन झांजे (मूळ रा. वाहिरा, ता. आष्टी, जि. बीड, हल्ली रा. केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रियकराचे नाव आहे. रविवार दिनांक 22 मे रोजी सदरचा प्रकार अल्पवयीन मुलीच्या घरात घडला आहे.

नेमकं काय घडलं?
अल्पवयीन मुलगी आई व आईचा प्रियकर वैजनाथ असे तिघे घरी होते. दरम्यान मुलीची आई सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मार्केटमध्ये भाजी आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी मुलगी आणि वैजनाथ घरी होते. मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत वैजनाथ याने फिर्यादीसोबत अश्लिल चाळे करण्यास सुरूवात केली. फिर्यादीने त्याला विरोध केला असता त्याने दम दिला. फिर्यादीसोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याबाबत ‘जर तु तुझ्या मम्मीला सांगितले तर ती माझ्याशी भांडेल आणि मग मी तुम्हाला दोघींना मारून टाकीन’ अशी धमकी दिली.

पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल
फिर्यादी घाबरलेली असल्याने तिने आईला सांगितले नाही. परंतु तिने हा सर्व प्रकार रविवारी (22 सप्टेंबर) तिच्या आईला सांगितला. त्यांनी दोघींनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वैजनाथ झांजे विरोधात विनयभंग, पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक मार्गात बदल; असा असेल वाहतूक बदल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हवेली तालुक्यातील मौजे पेरणे फाटा येथे एक जानेवारी २०२२ रोजी जयस्तंभ...

भारताचे १४ वे पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे निधन

Former Prime Minister Manmohan Singh : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं २६...

सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडू नका; मंत्री धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

Politics News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये धनजंय...

साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक; गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शिर्डी । नगर सहयाद्री:- भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक होत असल्याचा...