कचरा संकलनासाठी महापालिकेच्या ८० घंटागाड्या शहरात धावणार
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
देशामध्ये इंदूर हे स्वच्छ शहर म्हणून ओळखले जात असून आपले शहर देखील स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करू. यासाठी नागरिकांच्या सहकार्याची खरी गरज आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून कचर्याची समस्या निर्माण झाली होती आता शहरात महापालिकेच्या माध्यमातून ८० घंटागाड्या धावणार असून नागरिकांनी आपला कचरा घंटागाड्यांमध्येच टाकावा मुंबईमध्ये ज्याप्रमाणे रस्ता काँक्रिटीकरणाची कामे झाली आहेत, त्याचप्रमाणे आपल्या शहरात देखील सुरू आहेत. काही संस्थांच्या माध्यमातून चौक सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत. हायजिन फर्स्टच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना हॉटेल हातगाड्यांच्या माध्यमातून स्वच्छ अन्न मिळावे यासाठी जनजागृतीचे काम केले जाते. संस्थापिका वैशाली गांधी यांच्या हस्ते घंटागाड्या कचरा संकलनाचा शुभारंभ झाला असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने ८० घंटागाड्या कचरा संकलन कामाचा शुभारंभ वाडियापार्क येथे हायजिन फर्स्टच्या संस्थापिका वैशाली गांधी यांच्या हस्ते झाला, त्यावेळी आमदार संग्राम जगताप बोलत होते.

यावेळी आयुक्त यशवंत डांगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, संजय शेंडगे, उपायुक्त संतोष टेगळे, माजी उपमहापौर गणेश भोसले, अनिल बोरुडे, दीपक सूळ, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष किशोर डागवाले, मनोज कोतकर, अविनाश घुले, माजी नगरसेवक संजय चोपडा, रेश्मा आठरे, लता शेळके, निखिल वारे, सचिन जाधव, शिवाजी चव्हाण, धनंजय जाधव, संभाजी पवार, बाळासाहेब पवार, अजिंय बोरकर, प्रकाश भागानगरे, विनीत पाऊलबुधे, रामदास आंधळे, अमोल गाडे, प्रा. माणिकराव विधाते, हनुमंत कातोरे, विजय गव्हाळे, सचिन शिंदे, अरविंद शिंदे, अजय चितळे, मनोज साठे, दत्ता मुदगल, युवराज शिंदे, विपुल शेटिया, ज्ञानदेव पांडुळे, दगडू मामा पवार, संजय ढोणे, सुनील त्रिंबके, सतीश शिंदे, महेश लोंढे, महेश तवले, अभिजीत बोरुडे, जितू गंभीर, वैभव ढाकणे, वैभव वाघ, शंभू गिरवले, सुनील कोतकर, महेंद्र कांबळे, संतोष ढाकणे, सारंग पंधाडे, रणजीत सत्रे, जालिंदर कोतकर, सुमित लोंढे, नितीन शेलार, प्रदीप परदेशी, सुरेश बनसोडे, अतुल जाधव, गोरख पडोळे, दीपक खेडकर, अमित खामकर, टिनू भंडारी, प्रशांत बेल्हेकर, सोनू घेबूड, अशोक साबळे आदीसह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, शहरांमधील कचरा संकलन करण्यासाठी स्वयंभू ट्रान्सपोर्ट ही एजन्सी नव्याने नेमली असून ८० घंटागाड्या घरोघरी जाऊन कचर्याचे संकलन करणार आहेत. याचबरोबर घंटागाडी आपल्या घरी नाही आली तर हेल्पलाईनवर फोन करावा, तातडीने घंटागाडी उपलब्ध होईल, देशामधील स्वच्छतेच्या स्पर्धेमध्ये ड वर्ग महापालिका क्षेत्रामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेचा देशात पाचवा क्रमांक आला आहे. हाच क्रमांक एक पर्यंत घेऊन जायचं आहे. तरी शहरातील प्रत्येक नागरिकांनी आपला कचरा घंटागाडीमध्येच टाकावा असे आवाहन त्यांनी केले.
वैशाली गांधी म्हणाल्या की हायजिन फर्स्ट या संस्थेच्या माध्यमातून हायजिन सिटी बनविण्याचे काम सुरू आहे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आपले शहर स्वच्छ रहावे यासाठी ८० घंटागाड्या उपलब्ध झाल्या आहेत. शहरातील नागरिकांनी आपले घर ज्याप्रमाणे स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे आपला परिसर व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. मनोज कोतकर म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून शहरात कचर्याची समस्या निर्माण झाली होती. ती सोडविण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी प्रयत्न केले असल्यामुळेच ८० घंटागाड्या उपलब्ध झाल्या आहेत़ आता कचर्याचा प्रश्न मार्गी लागला जाईल.
रस्त्यावर कचरा टाकणार्यांवर कारवाई करावी
शहरातील काही नागरिक घंटागाडी येऊन देखील रस्त्यावर नालीमध्ये कचरा टाकण्याचे काम करत आहेत. तसेच बांधकाम साहित्य सर्वत्र पडलेले दिसत आहे. त्यामुळे गटारी बंद झाल्या आहेत. महापालिकेने आतापर्यंत रस्त्यावर कचरा टाकणार्यावर कुठलीही कारवाई केली नाही. यापुढील काळात जो कोणी रस्त्यावर कचरा टाकेल त्याच्यावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई महापालिका प्रशासनाने करावी. उपायक्त दर्जाच्या अधिकार्यांना जर काम करायचे नसेल तर त्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत. त्यांनी देखील शहरात फिरून काम केले पाहिजे. अन्यथा त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला.



