spot_img
ब्रेकिंगमहायुतीची आघाडी! १०० उमेदवारांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब! केव्हा जाहीर होणार पहा..

महायुतीची आघाडी! १०० उमेदवारांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब! केव्हा जाहीर होणार पहा..

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत १० ऑक्टोबरला नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन घोषणा होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीची पहिली उमेदवार यादी विजयादशमीच्या मुहूर्तावर जाहीर होण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र महायुती यात आघाडी घेण्याची शक्यता आहे.

घटस्थापनेच्या मुहूर्तावर पहिली यादी?
पितृपक्षाच्या काळात उमेदवारांची घोषणा, जागावाटप जाहीर करणं या गोष्टींना ब्रेक लागला होता. मात्र उद्या घटस्थापनेसह नवरात्राचा आरंभ होत आहे. पहिल्याच दिवशी महायुती उमेदवार यादीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे.

सह्याद्री अतिथिगृहावर नुकतीच भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जागावाटपाचे सूत्र अंतिम झाल्याची माहिती आहे.

कोणत्या पक्षाचे किती उमेदवार?
घटस्थापनेच्या मुहूर्तावर महायुतीच्या १०० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपाचे ५०, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ३६, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या १४ उमेदावरांची नावं जाहीर होण्याचे संकेत मिळत आहेत. पहिल्या यादीत बहुतांश विद्यमान आमदारांची समावेश असेल. याशिवाय स्टार प्रचारकांच्या नावांवर देखील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

विधानसभेचा धुरळा उडाला
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आधीपासूनच सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते तयारीला लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. इच्छुक उमेदवारांनीही कंबर कसली असून राजकीय नेत्यांच्या ‘उड्या’ही सुरु झाल्या आहेत.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये लागलेला निर्णयांचा धडाका पाहता विधानसभा निवडणुकांची घोषणा आठवडाभरात होण्याच्या शक्यतेला बळ मिळत आहे. १० ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्राबरोबरच झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणाही होऊ शकते.

राऊत-नड्डा आणि ठाकरे-फडणवीस भेटीगाठींचा दावा
याआधी, शिवसेना खासदार संजय राऊत हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना भेटले. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गाडी चालवत एकटेच मातोश्री बंगला येथे गेले, दोन तास त्यांची बैठक झाली, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी केला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरातील तीन समाजकंटक हद्दपार; वाचा नगर क्राईम

​अहिल्यानगर । नगर सह्याद्री ​अहिल्यानगर शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोतवाली...

जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार : चेअरमन चंद्रशेखर घुले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोनेतारण व्यवसायात वाढ करणार...

सामूहिक आत्महत्येने नाशिक हादरले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने २ मुलांसह विहिरीत मारली उडी

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना...

मनपाच्या मतदार यादीत २० हजार नावांची हेराफेरी; कोण काय म्हणाले पहा

दोषींवर गुन्हा दाखल करण्याची नितीन भुतारे यांची मागणी अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेने...