अहमदनगर | नगर सह्याद्री
नवनागापूरमध्ये छत्रपती नगर परिसरात आठ महिन्यापूर्वी लोकवर्गणीतून ओपन स्पेसमध्ये बांधलेले शनी मंदिर व मारुती मंदिरचा चौथरा ग्रामपंचायत प्रशासनाने जेसीबी लावून पाडला. या घटनेमुळे हिंदू समाज बांधवांच्या भावना दुखावल्या असून ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
दिनांक २२ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता नगर तालुक्यातील नवनागापूर येथील शनी मंदिर व मारुती मंदिरचा चौथरा ग्रामपंचायत प्रशासनाने जेसीबी लावून पाडला. या घटनेची माहिती नागरिकांना समजताच नागरिकांनी मंदिर परिसरात धाव घेत ग्रामपंचायत सत्ताधार्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
दरम्यान, हे मंदिर आठ महिन्यापूर्वी लोकवर्गणीतून बांधण्यात आले होते. मंदिरांचा चौथरा पाडून सत्ताधार्यांनी हिंदू समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. मंदिर पुर्ववत उभे राहत नाही तापर्यंत ग्रामस्थांचा लढा सुरुच राहणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच हिंदू समाज बांधवांच्या भावना दुखावल्याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यावरुन सागर चोथे यांच्या फिर्यादीवरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.