spot_img
महाराष्ट्रफॉर्म्युला ठरला! मंत्रिमंडळात कोण?; देवेंद्र फडणवीस, म्हणाले, 'ते' महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीर..

फॉर्म्युला ठरला! मंत्रिमंडळात कोण?; देवेंद्र फडणवीस, म्हणाले, ‘ते’ महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीर..

spot_img

35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार
Politics News: मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. 14 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता राजभवनात मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांना झुकते माप दिल्याचे सूत्रांनी सांगितलेय. 20-10-10 असा महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याचे समजतेय

हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. भाजपचे सर्वात जास्त आमदार असल्यामुळे वर्चचष्मा त्यांचाच असेल. 14 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता तिन्ही पक्षाचे मिळून 35 मंत्री शपथ घेणार असल्याचे समोर आलेय. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत भाजपचा वरचष्मा कायम राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. भाजपकडे सर्वाधिक 20 खाती राहण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना 10-10 खाती मिळणार आहे.

कुणाकडे कोणतं खातं?
देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्या दिल्लीतील बैठकीत झालेल्या चर्चेतून काही महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत. गृह आणि अर्थ ही महत्त्वाची खाती भाजपकडेच राहतील. नगरविकास शिवसेनेला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वाट्याला महसूल मिळू शकते. भाजपकडून सार्वजनिक बांधकाम खाते इतर गटाला सोपवण्याची तयारी असल्याचे सांगितले जात आहे.

मोदींची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया
 ‘आपला अमूल्य वेळ, मार्गदर्शन, आशीर्वाद आणि महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक आभार. गेल्या 10 वर्षात तुमच्या पाठिंब्याने महाराष्ट्र जवळपास प्रत्येक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे आणि आता तुमच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली विकासाचा हा प्रवास पुढील स्तरावर नेण्याचे ध्येय आहे. तुम्ही आमच्या सारख्या करोडो भाजप कार्यकर्त्यांना आणखी कठोर परिश्रम करण्यासाठी नेहमीच प्रेरणा देत आहेत.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...