spot_img
अहमदनगरखासदारांनीच कानफाड सुजवले असेल तर...!

खासदारांनीच कानफाड सुजवले असेल तर…!

spot_img

आग लागली म्हणून तर धूर निघाला! मार देणाऱ्याने आणि खाणाऱ्याने इन्कार केला असला तरी चर्चा तर होणारच! बोध घ्यायचा कोणी?
सारिपाट / शिवाजी शिर्के
रस्त्याचे काम रखडले, त्याबाबत अनेकदा मागणी झाली. त्याची दखल घेतली नाही म्हणून स्थानिक नागरिकांनी आंदोलन पुकारले आणि त्याची माहिती मिळताच खासदार निलेश लंके हे त्याठिकाणी गेले. काम का रखडले? असा प्रश्न करत त्यांनी अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या कर्मचान्यांना जाब विचारला. यावेळी संताप अनावर झाल्याने त्यांनी उपअभियंता व ठेकेदार कंपनीच्या कामगाराच्या कानशिलात भडकावल्याचे प्रत्यक्षदशनी सांगितले, अचानक झालेल्या या प्रकारामुळे आंदोलनस्थळी एकच गोंधळ उडाला. मात्र, असे घडलेच नसल्याचे खासदार लंके यांनी आणि त्या अधिकाऱ्याने देखील सांगून टाकले. मार खाणाराच जर नाही म्हणत असेल तर देणारा तरी मार दिला असे कसे म्हणेल? असे घडलेच नाही असे गृहीत धरले किंवा दोघांच्याही स्पष्टीकरणावर विश्वास ठेवायचा म्हटले तर त्याच्या बातम्या कशा झाल्या? प्रत्यक्षदशपैकी काहींनी मोबाईलमध्ये केलेले चित्रण खोटे आहे का असा प्रश्न यानिमित्ताने पडतो! आग लागली म्हणून तर धून निघत असतो, यानुसार झालेल्या घटनेचा कितीही इन्कार केला तरी त्यावर आता कोणीच विश्वास ठेवायला तयार नाही.

कार्यकर्त्यांसह नागरिकांनीअनुकरण करावे असे वाटते का?
गावागावातील व्यक्तीगत आणि सार्वजनिक कामाबद्दल अनेक समस्या आहेत. प्रशासनात गावपातळीवरील ग्रामसेवकापासून ते वरच्या अधिकाऱ्यापर्यतच्या काही मुजोरांमुळे प्रशासकीय यंत्रणा तशीही बदनाम झाली आहे. काम रखडल्याच्या रागातून आपले खासदार जर अधिकाऱ्याचे कानफाड फोडताना दिसणार असतील तर उद्या याचे अनुकरण गावागावात होणारच! त्याचे संपूर्ण श्रेय मग निलेश लंके यांनाच जाणार! अर्थात निलेश लंके यांना हेच अभिप्रेत आहे का हा खरा प्रश्न आहे.

प्रशासनाने कामात सुधारणा करण्याची गरज!
रखडलेल्या कामाला गती मिळणार नसेल आणि ते वेळेत होणार नसेल तर त्यातून कोणाचाही पारा चढणारच! खासदार लंके हे त्याला अपवाद कसे ठरतील. प्रशासनाने कालमर्यादेत राहून आपले काम करण्याची गरज आहे. ठेकेदार मुजोर झाला असेल तर त्याला पाठीशी घालण्याची गरजच नाही. चुकीची उत्तरे देण्याची धाडस होत असेल आणि तेही खासदारांना, तर त्यातून राग अनावर होणे आणि त्याची प्रतिक्रिया उमटणे हेही स्वाभाविकच!

‌‘माझ्या स्टाईलने सांगितले‌’, म्हणजे नक्की कसे?
आढळगाव येथे आंदोलन स्थळी गेलो असता मी ‌‘माझ्या स्टाईलने‌’ अधिकाऱ्यांना सांगितले. मी कुणावरही हात उचलला नाही. अपूर्ण कामात हलगजपणा झालेला आहे. यापुढे तो होऊ देणार नाही असे खा. लंके यांनी स्पष्टीकरण दिले. मात्र, माझ्या स्टाईलने म्हणजे नक्की कोणत्या स्टाईलने याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले नाही. प्रत्यक्षदशच्या म्हणण्यानुसार खासदार लंके यांनी अधिकाऱ्याचे कानफाड फोडलेय!

खासदार लंके यांनी संयम बाळगण्याची गरज!
खासदार होण्याआधी निलेश लंके यांच्याकडून वादग्रस्त विधाने झाली. पोलिसांना उद्देशूनही त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्याआधी भाळवणी येथील कोवीड सेंटरमध्ये गौण खनिज अधिकाऱ्याबाबतही कालच्या सारखाच प्रकार घडला होता. त्यावेळीही दोघांनीही कानावर हात ठेवला आणि असे काहीच घडले नसल्याचे सांगीतले होते. पारनेरच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यासह तहसीलदारांबाबतही तेच घडले होते. राग अनावर न झाल्याने हे सारे घडले असेल! मात्र, आता खासदार या नात्याने जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून संयम बाळगण्याची गजर आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रभाग रचनेबाबत महत्वाचे आदेश प्राप्त; सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना, असा आहे कार्यक्रम

सुनील चोभे | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने...

‌‘सेनापती बापट‌’ मध्ये गैरव्यवहार! चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

पारनेर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील 75 वषय शेतकरी आणि विमा...

नगर, श्रीगोंदा, शेवगाव,पाथर्डीत तुफान वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

पिकांचे नुकसान | शेड, घराची पत्रे उडाली | जेऊर, चिचोंडी पाटील, खडकीत नुकसान अहिल्यानगर...

‌‘रयत‌’चे विध्यार्थी गिरवणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे धडे: चेअरमन चंद्रकांत दळवी

कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत शिक्षण देणारी राज्यातील पहिली शिक्षण संस्था ‌‘रयत‌’ ठरणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री आर्टिफिशियल...