spot_img
अहमदनगरफायनल? खासदार सुजय विखेच ठरणार ’बाजीगर’

फायनल? खासदार सुजय विखेच ठरणार ’बाजीगर’

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
लोकसभेच्या निवडणुका सध्या तोंडावर आहेत. अवघ्या काही दिवसांत आचारसंहिता लागेल. दरम्यान आता महायुतीच्या जागावाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अहमदनगर लोकसभेची जागा खा. सुजय विखे यांनाच फायनल झाल्याची चर्चा आहे. याला विविध कारणांची किनार देखील आहे.

भाजपच्या चारशे पेक्षा अधिक जागा जिंकायच्या हे उद्दिष्ट असल्याने यंदा भाजप कडून उमेदवारी देताना विविध प्रयोग करण्याचे टाळले जाणार असल्याचे काही नेते बोलत आहेत. त्यामुळे विद्यमान खासदार असलेल्या जागांवर नवीन उमेदवार न देण्याचे संकेत दिसत आहेत. तसेच काही ठिकाणी मंत्र्यांना मैदानात उतरवण्याचे ठरले असल्याच्या चर्चा सध्या होत होत्या. त्यामुळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेही नाव खा. सुजय विखे यांना पर्याय म्हणून चर्चेत आले होते. परंतु आता मंत्र्यांना मैदानात उतरवण्याच्या चर्चांबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी या चर्चांबाबत नकार दिला असल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावात तथ्य नसल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे.

केंदीय नेतृत्व चारशे पारचे उद्दिष्ट ठेवत असल्याने अहमदनगरमध्ये जास्त रिस्क ते घेऊ शकत नाहीत. जिल्ह्यात आणि राज्यात विखे यांचे मोठे स्थान आहे. एक मोठी यंत्रणा ते निवडणुकीसाठी वापरत असतात. २०१९ ला सुजय विखे पहिल्यांदाच उमेदवारी करत असताना आणि त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात नुकताच प्रवेश केलेला असतानाही मिळवलेला विजय ही किमया विखेच करू शकतात हे अधोरेखित झाले. त्यामुळे असा पॉवरफुल उमेदवार भाजप टाळणार नाही अशा चर्चा सध्या आहेत.

भाजप केंद्रीय नेतृत्व विखे परिवारासोबत असून कुठलाही धोका नको म्हणून सुजय विखे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यात जमा असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. त्यातच आता राज्यात भाजपकडून मुनगंटीवार, आशिष शेलार, प्रवीण तावडे, पंकजा मुंडे अशी अनेक नावे लोकसभेसाठी पुढे येत असली तरी यातून आता मंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव गायब झाल्याने खा. सुजय विखे यांचा दुसर्‍यांदा लोकसभा निवडणुकीचा मार्ग सुकर झाला असल्याचे म्हटले जात आहे.

कार्यक्रमातील उत्साह व मै हू डॉन गाण्यावरील नृत्य
सध्या खा.सुजय विखे यांनी मतदारसंघात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. यात महिला वर्गाला टार्गेट करत आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रम, स्पर्धा आणि बक्षिसांची लयलूट सुरू आहे. हे सर्व लोकसभेचे तिकीट फायनल झाल्यानेच हे कार्यक्रम सुरु आहेत. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात मै हू डॉन गाण्यावर ठेका धरत लोकसभेची उमेदवारी फायनल झाल्याचा आनंद घेत आहेत असे बोलले जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...