spot_img
अहमदनगरमळगंगा देवीला हळद लावण्याचा उत्सव भक्तिभावाने साजरा

मळगंगा देवीला हळद लावण्याचा उत्सव भक्तिभावाने साजरा

spot_img

निघोज / नगर सह्याद्री :
राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीला हळद लावण्याचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने पारनेर तालुक्यातील निघोज येथे साजरा करण्यात आला. दरवर्षी चैत्र अष्टमीला देवीची मुख्य यात्रा सुरु होते. त्याअगोदर दहा दिवस हळद लावणे, देवीची काठी उभारणे हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे. शुक्रवार दि.११ हळद लावणे, शनिवार दि.१२ रोजी देवीची ८५ फूट उंचीची काठीची मिरवणूक काढण्यात येते या मिरवणूकीला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. शुक्रवार दि.११ रोजी दुपारी चार वाजता हळदीची मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिला भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी मळगंगा देवीच्या हेमांडपंथी बारवेत असणाऱ्या देवीच्या मुर्तींना हळद लावण्यात आली. तसेच राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या मुख्य मंदीरात असलेल्या देवीच्या मुर्तीला हळद लावण्यात आली. या वेळी निघोज व परिसरातील वाडी वस्ती गाव परिसरातील महिला भगीनी हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या. मळगंगा देवीचा जयजयकार करीत हा हळद लावण्याचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. तसेच महिला भगीनी यांनी एकमेकींना हळद लावीत हळदीचा आनंद घेतला. तसेच मुख्य यात्रा सोमवार दि.२१ रोजी बगाडगाडा मिरवणूक, त्यानंतर देवीला अंबीलचा नैवेद्य, रात्री छबिणा मिरवणूक रात्री नऊ ते रात्री दोन वाजेपर्यंत त्यानंतर देवीच्या हेमांडपंथी बारवेत श्रीं चे घागर दर्शन, मंगळवार दि.२२ रोजी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत देवीच्या श्रींचे घागर मिरवणूक, दुपारी चार वाजता मिरवणूकीने छबिणा कुंडावर जात असतो त्यानंतर कुंडमाऊली मळगंगा देवीची यात्रा सुरू होते. रात्री छबिणा मिरवणूक त्यांनतर टाकळी हाजी ग्रामस्थ यांच्या वतीने तमाशाचे आयोजन, बुधवार दि. २३ रोजी कुंडावरील यात्रेची सांगता दुपारी चार ते सात वाजेपर्यंत कुस्ती हगाम्याने सांगता, या कुस्तीच्या आखाड्यात राज्यातील नामवंत पैलवान उपस्थित असतात.

गुरुवार दि.२४ रोजी हजरत शहामदीर कादरी दर्गा यांचा उरुस या निमित्ताने शाही मिरवणूकीचे आयोजन तसेच रात्री दहा वाजता नामवंत तमाशा मंडळाचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. शुक्रवार दि.२५ रोजी कुस्तीच्या हगाम्याने या उरुसाची सांगता होणार आहे. शनिवार दि.२६ रोजी निघोज ग्रामस्थ, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती संघ मुंबई निघोज यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी पाच ते साडेसात वाजता वाजत गाजत डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची मिरवणूक यावेळी समाजबांधव, महिला भगीनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहात असतात. रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन, रात्री उशिरा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन अशाप्रकारे यात्रा जत्रा, उरुस, आंबेडकर जयंती हे सर्व उत्सव निघोज ग्रामस्थ मुंबईकर मंडळ व मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट तसेच ग्रामपंचायत व विविध सहकारी संस्था तसेच सामाजिक संस्था एकत्रितपणे साजरा करीत असतात.

राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या हळदीच्या कार्यक्रमला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील आवर्जून उपस्थित होत्या. राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून देवीच्या हळदीच्या कार्यक्रमाला आपल्याला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. देवीचा महिमा अगाध असून राज्यातून तसेच परराज्यातील भावीकांची उपस्थीती लाखोंची असते. राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून या यात्रेची विशेष दखल घेण्यात येत असून या तिर्थक्षेत्र विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार असून राज्याचे जलसंपदामंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तिर्थक्षेत्र विकास योजनेसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही विखे ताई यांनी दिली आहे. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्या पुष्पाताई संदीप वराळ पाटील, सरपंच चित्राताई वराळ पाटील तसेच परिसरातील महिला भगीनी यांनी विखे ताई यांचे जोरदार स्वागत केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्यात पुन्हा सैराट! बहिणीच्या बॉयफ्रेंडला आई अन् भावाने संपवलं

पुणे । नगर सहयाद्री :- पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बहिणीच्या बॉयफ्रेंडचा...

‘पुढील आठवड्यात सरपंच आरक्षण सोडत’

महिला आरक्षण उपविभागीय, तर सर्वसाधारण अन्य प्रवर्गाचे तहसील पातळीवर काढणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री ग्रामविकास विभागाने...

फडणवीस सरकारचा ‘मोठा’ निर्णय; अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार

गैरप्रकार सहन केला जाणार नाही: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई | नगर सह्याद्री रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच...

फलक लावणे गैर काय? ते माझे काका!; आमदार रोहित पवारांनी भूमिका केली जाहीर

कर्जत । नगर सहयाद्री:- कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर...