spot_img
अहमदनगर'कान्हूरपठार' च्या महिला सरपंचाने उपसरपंचाला कानफाडले!, नेमकं काय घडलं?

‘कान्हूरपठार’ च्या महिला सरपंचाने उपसरपंचाला कानफाडले!, नेमकं काय घडलं?

spot_img

निलेश लंके प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्याकडून महिला सरपंचाला अपशब्द | ग्रामपंचायत सदस्यांच्या मासिक बैठकीत कानशिल सुजवले
पारनेर | नगर सह्याद्री:-
कान्हूरपठार ग्रामपंचायत सदस्यांची मासिक बैठक सुरू असताना मुद्यावर चर्चा न करता उपसरपंच प्रसाद नवले यांच्याकडून अपशब्द आले. अपशब्द वापरल्यानंतर संतप्त झालेल्या सरपंच सौ. संध्या किरण ठुबे यांचा संयम सुटला आणि त्यांनी भर मासिक मिटींगमध्ये उपसरपंच प्रसाद नवले यांच्या कानशिलात लगावली. कानफाडात आवाज निघताच बैठकीत सर्व सदस्य अवाक झाले. कोणतेही कारण नसताना याआधी आणि वारंवार अपमनास्पद शब्दप्रयोग प्रसाद नवले वापरत आले. एका महिलेसोबत कसे बोलावे याचे साधे भानही त्यांना नाही. महिलेचा अवमान आणि अपमान करण्याची त्यांची ही पहिली वेळ नाही. याआधीही त्यांनी तेच केले. मी त्यांना समजावून सांगूनही त्यांच्यात काही सुधारणा झाली नाही. त्यामुळे माझा संयम सुटल्याचे सरपंच सौ. संध्या ठुबे यांनी सांगितले. दरम्यान, मी अपमानास्पद कोणताही अपशब्द वापरला नाही. फार्म बारा आणि तत्सम बाबीबाबत मी माहिती घेत असताना त्यांनी माझ्या कानशिलात मारली. त्यांचे वर्तन योग्य नाही. मी पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची प्रतिक्रीया उपसरपंच प्रसाद अशोक नवले यांनी दिली.

राजकीय दृष्ट्या संवेदनशिल आणि महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील कान्हूरपठार ग्रामपंचायतीमध्ये खा. लंके समर्थकांची सत्ता आहे. जनतेमधून निवडून आलेल्या लोकनियुक्त सरपंच म्हणून सौ. संध्या किरण ठुबे या काम पाहत आहेत. सदस्यांमधून उपसरपंचाची निवड झाली आणि त्यात प्रसाद अशोक नवले यांची उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली. सव्वावर्षापूव ही निवड झाली. दरम्यान, ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण बहुमत लंके समर्थकांचे आहे. ग्रामपंचायत सदस्यांची मासिक बैठक सुरू असताना त्या बैठकीत उपसरपंच प्रसाद नवले यांनी काही मुद्दे उपस्थित करताच सरपंच सौ. ठुबे यांनी प्रसाद नवले यांच्या कानशिलात वाजवली.

महिलांशी कसे बोलावे याचे भान राहिले नसेल तर त्यांना भानावर आणणे माझे कर्तव्य आहे. या प्रसंगात गावकरी माझ्यासोबत आहेत. माझी काहीच चूक नसताना मी अशा विकृत मानसिकतेला अटकाव केला पाहिजे असे मला वाटले आणि त्यातून जे काही झाले ते झाले. जे झाले त्याचा काडीचाही पश्चाताप मला नसून त्या विकृताचे समर्थन करणाऱ्यांनी आधी त्याला महिलांशी कसे बोलायचे हे शिकवावे असा टोला सरपंच सौ. संध्या ठुबे यांनी लगावला.

स्वच्छ भारत मिशनचा निधी ग्रामपंचायतीकडे आला आहे. त्यानुसार आम्ही जागा पाहणी केली. घनकचरा व्यवस्थापनाचा हा निधी. जागा पाहणी करताना आम्ही सहा- सात सदस्य उपस्थित होतो. त्यांना यात डाववलले असे त्यांना वाटले. मात्र, कोणाला डावलण्याचा यात विषयच नाही. सर्वांना विश्वासात घेऊन मी काम करत आले आहे आणि काम करत राहणार आहे. जनतेने मला सरपंच म्हणून निवडून दिले आहे आणि त्यांच्या विश्वासास पात्र ठरेल असेच काम मी करत राहणार असल्याचेही सरपंच सौ. ठुबे यांनी सांगितले.

आमचा बाप काढला जात असेल तर…!
महिला म्हणून काम करत असताना प्रसाद नवले हा कायम अरेरावी आणि दादागिरीची भाषा करत आला. अनेकदा त्याच्याकडून अपमान झाला असतानाही मी तो सहन केला. मात्र, कालच्या बैठकीत त्याने माझा बाप काढत अपमानास्पद आणि अश्लिल शिवीगाळ केली. माझ्यातही छत्रपती शिवरायांचेच रक्त आहे. काहीच कारण नसताना माझा बाप कोणी काढत असेल तर मी का सहन करु?

निषेध व्यक्त करत दुपारपर्यंत गावबंदची हाक!
उपसरपंच प्रसाद नवले यांनी त्यांना झालेल्या मारहाणीबाबत त्यांच्या समर्थकांना माहिती दिली. त्यांनी मंगळवारी गावबंद ठेवत या घटनेचा निषेध नोंदविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सकाळी आवाहन करण्यात आले. गावातील मुख्य चौकातील दुकाने दुपारी बारापर्यंत बंद ठेवण्यात आली. व्यावसायिकांचे नुकसान होऊ नये म्हणून आपण स्वत: पुढाकार घेतला आणि गावबंद मागे घेण्यात आल्याची माहिती उपसरपंच प्रसाद नवले यांनी दिली.

चेकबुक चोरणारा हाच तो प्रसाद नवले!
गारगुंडी रस्त्यावर दहा हजाराचा मुरुम टाकत ग्रामपंचायतीकडे सत्तर हजार कोणी मागितले हे त्यांनी शपथेवर सांगावे. गेल्या वर्षभरात बोगस बीलांचा विषय नाही. कोणत्याही कामाचे कमीशन घेत नाही. अनेकांची कामे चालू आहेत. दोन लाख रुपयांची पदरमोड करत लाईट लावल्या आहेत. अद्यापही बील काढले नाही. पंधरा दिवसांपूव ग्रामपंचायत कार्यालयात येऊन याच प्रसाद नवले याने चेकबुक चोरले! सीसीटीव्ही तपासले असता त्यात हे स्पष्ट झाले. कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची तयारी केल्यावर याच प्रसादने ग्रामपंचायत कर्मचारी बाळू सोनावळेजवळ चेकबुक दिल्याचा गौप्यस्फोट सरपंच सौ. संध्या ठुबे यांनी केला.

बोगस बिल काढल्याचे उघड केल्याने माझ्यावर हल्ला!
सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. पाणी टंचाई, टँकर प्रस्ताव, पथदिवे बिल, दारूबंदी, बोगस बिल, एक वर्षभर जो अनागोंदी खर्च केला व त्याचा तपशील द्या तसेच दारूबंदी ह्या विषयावर विशेष ग्रामसभा लावा ह्या सगळ्याची विचारपूस ग्रामसेवक यांना करत असताना सरपंच यांनी बोगस बिल काढल्याचे उघड केल्याचे कारणाने राग येऊन कोणत्याही प्रकारचे कारण नसताना अरेरावी केली व माझ्यावर हल्ला केला. यानंतर मी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, खासदार निलेश लंके यांच्या विचाराचे पाईक असल्याने व महिलांचा आदर करत असल्याने आम्ही शांतता राखली. ग्रामस्थ व व्यापारी वर्गाने स्वयंपूतने आज गाव बंद ठेवून झालेल्या घटनेचा निषेध नोंदवला.
– प्रसाद नवले (उपसरपंच, कान्हूरपठार)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जी. एस. महानगर बँक निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार, मोठी माहिती समोर..

पारनेर | नगर सह्याद्री जी एस महानगर बँकेची निवडणूक लवकरच होणार असून यासाठी मतदारांची नवीन...

मनपाचे 1680 कोटींचे बजेट मंजूर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेचा सन 2024-2025 चा सुधारीत व सन 2025-2026 चा मूळ...

स्मशानभूमी परिसरात थाटला ‘ऑक्सिजन पार्क‌‌‌’; नगर जिल्ह्यातील ‘या’ गावाची चर्चा!

वृक्षप्रेमी रसाळ बंधु यांचे कार्य कौतुकास्पद: आमदार काशिनाथ दाते पारनेर । नगर सहयाद्री:- निसर्गाच्या सान्निध्यात वृक्ष...

भैय्या! सुरुवात करतोय, आशीर्वाद असू द्या; किरण काळे पुन्हा शिवसेना मजबूत करणार

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- शिवसेनेचे दिवंगत नेते माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांनी आयरनजर शहरांमध्ये...