spot_img
ब्रेकिंगपोलिसांचा धाक संपला?, पुन्हा सरपंच देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला!

पोलिसांचा धाक संपला?, पुन्हा सरपंच देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला!

spot_img

Crime news: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरुन राज्यात संतप्त प्रतिक्रिया अजूनही सुरु आहे. त्यातच पुन्हा एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सुटाळा ग्रामपंचायतच्या सरपंचावर लोखंडी रॉडने हल्ला जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात सरपंच निलेश देशमुख गंभीर जखमी झाले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथील सरपंच निलेश देशमुख यांच्यावर लोखंडी रॉडने हा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत निलेश देशमुख गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आला आहे.

हॉटेलमध्ये थुंकण्यावरून हा वाद झाला आहे. सरपंच निलेश देशमुख आणि त्यांचे मित्र हे बारमध्ये जेवायला बसलेले होते तर आरोपी सुद्धा बाजूच्या केबिबमध्ये जेवायला बसलेले होते. दोन्ही गटात यावेळी थुंकण्याच्या कारणावरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर मारामारीत झाले. या शुल्लक कारणामुळे सरपंच निलेश देशमुख यांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर हा जीव घेणा हल्ला करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संदीप थोरात टोळीमागे आता ‌‘मनीमॅक्स‌’ची साडेसाती!

पोलीस अधीक्षक राकेश ओला आले ॲक्शन मोडवर | अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी...

शहराच्या उपनगर भागांसाठी ‘ती’ योजना; आयुक्त यशवंत डांगे यांची मोठी माहिती

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत योजनेअंतर्गत भुयारी गटार योजना व मलनिस्सारण...

पोलिस कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा; एसपी ओला यांचे चौकशीचे आदेश, नगर मधील बहुचर्चित हत्या प्रकरण

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- युवकाच्या अपहरण व खून प्रकरणात एका पोलिस कर्मचाऱ्याने हलगर्जीपणा केल्याची...

..आता देशद्रोहाचा खटला दाखल करा!; शिवबा संघटनेचे मावळे विधान भवनावर, मागणी काय?

पारनेर । नगर सह्यादी:- आबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून आमदारकी रद्द करण्याची व...