spot_img
महाराष्ट्रफूटपाथवर झोपलेल्या तीन जणांचे डोळे पुन्हा उघडलेच नाही?; भरधाव डंपरने चिरडलं!

फूटपाथवर झोपलेल्या तीन जणांचे डोळे पुन्हा उघडलेच नाही?; भरधाव डंपरने चिरडलं!

spot_img

Accident News: रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्याच्या वाघोली परिसरात भरधाव वेगाने आलेल्या एका डंपरने फूटपाथवर शांतपणे झोपलेल्या 9 जणांना निर्घृणपणे चिरडलं. यात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. डंपर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.गजानन शंकर तोट्रे (वय 26) असे त्या चालकाचे नाव आहे. या अपघात तिघांचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

अंधुक माहिती अशी: वाघोली परिसरात केसनंद फाट्याजवळ मध्यरात्री 1-1.30 च्या सुमारास दारूच्या नशेत असलेल्या डंपर चालकाने झोपेत असलेल्या 9 जणांना चिरडलं. फूटपाथवर झोपलेले, जखमी असलेलेल हे सर्व अमरावतीचे रहिवासी असल्याचं समजतं. काम शोधण्यासाठी ते पुण्यात आले होते आणि वाघोली परिसरातील एका फूटपाथवर ते झोपले होते.

मात्र झोपेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यापैकी तिघांचा तर जागीच मृत्यू झाला, त्यांना रुग्णालयातही नेण्यात आलं नाही. तर 6 जखमींपैकी तिघांची प्रकृती ही अतिशय चिंताजनक असल्याचे समजते. त्यांच्यावर ससून रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. तर तिनही मृत व्यक्तींचे मृतदेह हे पोस्टमॉर्टमसाठी ससूनमध्ये आणण्यात आले आहेत.

रविवारी रात्री झालेल्या या दुर्दैवी घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. विशाल विनोद पवार (वय 22 वर्ष), वैभवी रितेश पवार (वय 1 वर्ष) आणि वैभव रितेश पवार (वय 2 वर्ष) अशी तिघांची नावं आहेत. तर जानकी दिनेश पवार (वय 21), रिनिशा विनोद पवार (वय 18), रोशन शशादू भोसले (वय 9), नगेश निवृत्ती पवार (वय 27), दर्शन संजय वैराळ (वय 18) आलिशा विनोद पवार (वय 47) अशी 6 जखमींची नावं आहेत. त्यांच्यावर आयनॉक्स हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

केडगाव हादरलं! महिलेवर सामूहिक अत्याचार; तीन ते चार जणांनी घेरलं अन्..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री केडगाव उपनगरातील एका परिसरात सामूहिक अत्याचार झाल्याचे वृत्त हाती आले आहे....

दोन झेडपी तर चार पंचायत समिती सदस्य वाढले; अनेक गावांचे गट बदलले, वाचा प्रारूप प्रभाग रचना..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार सोमवारी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद व पंचायत...

ऑलिम्पिकचे वेळापत्रक जाहीर ; क्रिकेटचाही समावेश, वाचा, कधी कुठली स्पर्धा?

Olympic schedule : बहुप्रतीक्षित ऑलिम्पिकचे वेळापत्रक जाहीर झाले असून ऑलिम्पिक 2028 स्पर्धेचा उद्घाटन समारंभ...

पावसाने पुन्हा एकदा दणका दिला! ‘कमबॅक’ मुळे या’ भागात पुरजन्य स्थिती, अहिल्यानगरलाही इशारा..

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात पावसाने पुन्हा जोर पकडला असून अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची...