spot_img
अहमदनगरट्रॉफिकच्या हप्तेखोर बोरसेंना दोन दिवसात हाकला!; नगर शहरवासीयांच्या भावनांची आ. संग्राम जगताप...

ट्रॉफिकच्या हप्तेखोर बोरसेंना दोन दिवसात हाकला!; नगर शहरवासीयांच्या भावनांची आ. संग्राम जगताप यांच्याकडून दखल

spot_img

‌‘नगर सह्याद्री‌’चा इम्पॅक्ट | आ. जगताप यांनी एसपींना दिला अल्टीमेटम। खातेनिहाय चौकशी करण्याची गृहमंत्र्यांकडे मागणी
सारिपाट / शिवाजी शिर्के
नगर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याऐवजी आणि त्याचे नियमन योग्य पद्धतीने करण्याऐवजी सातत्याने हप्तेखोरीत अडकत महिनाकाठी पन्नास लाखांची हप्तेखोरी करणाऱ्या ट्राफीक शाखेचे अधिकारी बाबासाहेब बोरसे या अधिकाऱ्याला या पदावरुन दोन दिवसात कार्यमुक्त करा आणि नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करा अशी मागणी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी थेट पोलिस अधीक्षकांना भेटून केली आहे. बोरसे याच्या हप्तेखोरीचे रेटकार्ड ‌‘नगर सह्याद्री‌’च्या माध्यमातून समोर येताच नगर शहरवासीयांमधून संताप व्यक्त झाला. वाहतूक नियमन करण्यात सपशेल अपयशी ठरणाऱ्या बोरसे याने खासगी इसम नियुक्त करुन त्यांच्या माध्यमातून हप्तेखोरीच्या टोळ्या निर्माण केल्या असल्याने त्याच्या या कृत्याने नगर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भितीही आ. जगताप यांनी व्यक्त केली. दरम्यान, बोरसे याची हकालपट्टी करतानाच त्याच्या हप्तेखोरीची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणीही आ. जगताप यांनी केल्याने ‌‘नगर सह्याद्री‌’च्या वृत्तमालिकेवर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जाते.

तानवडेसारख्या टोळ्यांचा म्होरक्या झाला होता बोरसे!
हप्त्याचे रेटकार्ड दुप्पट करत ‌‘तानवडे‌’ सारख्या खासगी बगलबच्च्यांच्या माध्यमातून वाहन चालकांच्या खिशावर दिवसाढवळ्या दरोडा टाकणाऱ्या नगर शहर वाहतूक शाखेतील काळेकुट्ट कारनामे बाबा बोरसेच्या निमित्ताने चव्हाट्यावर आले आहेत. याच बाबा बोरसेच्या मनमानी आणि हप्तेखोरीतील कारभारातून वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असताना ही समस्या सोडविण्यास सपशेल अपयशी ठरलेल्या बोरसे याच्यामुळेच नगर शहरात दोन दिवसांपूव वाहतूक कोंडीत अडकून एका युवकाचा हकनाक बळी गेला. त्याआधी देखील अशा अनेक घटना नगर शहरात घडल्या. स्कुल बस चालक असणाऱ्या तानवडे सारख्या खासगी इसमांच्या टोळ्या हाताशी धरत हप्तेखोरी चालविणाऱ्या बोरसे याच्या कृष्णकृत्यांचा पर्दाफाश ‌‘नगर सह्याद्री‌’ने करताच नगरमधून संताप व्यक्त झाला. पोलिस कर्मचाऱ्यांपेक्षा तानवडे सारख्या खासगी इसमांच्या मध्यस्थीने वसुली करताना लाचलुचपतचा ट्रॅप टाळण्यासाठी बोरसे याने ही शक्कल राबविली का या प्रश्नासह गेल्या काही महिन्यात त्याने केलेल्या हप्तेखोरीतून कमविलेल्या मायेची चौकशी होण्याची गरज आहे.

आरटीओसह महापालिकेवर खापर फोडण्यासाठी बोरसेने नेमले होते एजंट!
स्वत:ची चूक झाकण्यासाठी बोरसे याने कायम महापालिका आणि आरटीओच्या अधिकाऱ्यांकडे बोट दाखवले. त्यातून स्वत:चे अपयश त्याने कायम झाकण्याचाही प्रयत्न केला. आरटीओ आणि महापालिकेवर वाहतूक कोंडीचे खापर फोडण्यासाठी बोरसे याने काही एजंटांना हाताशी धरत तशा चर्चा देखील झडवून आणल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

बाबा बोरसेवर सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का?
पाथडतील एका अत्यवस्थ रुग्णाला नगरमध्ये आणले जात असताना तारकपूर परिसरात वाहतूक कोंडी झाली. त्याचे कोणतेही नियमन ट्राफीक शाखेचे प्रमुख म्हणून बोरसे याने केले नव्हते. वाहतूक कोंडी झाली आणि त्यात जवळपास अर्धा तास गेल्याने रुग्णाचा वाहनातच मृत्यू झाला. हा बळी जाण्यास सर्वस्वी वाहतूक शाखेचे प्रमुख या नात्याने बाबासाहेब बोरसे हेच जबाबदार असल्याने त्यांच्यावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. याबाबत नगरमधील काही स्वयंसेवी संघटनांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे.

वाहतूक कोंडी अन्‌‍ हप्तेखोरीही नित्याचीच!
वाहतूक कोंडी नाही असा रस्ताच सध्या नगरमध्ये दिसून येत नाही. त्यातून दुचाकी चालकांसह सर्व प्रकारच्या वाहन चालकांमध्ये वाहतूक शाखेच्या विरोधात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. आ. संग्राम जगताप यांनी मध्यंतरी कामकाजात सुधारणा करण्याच्या सुचना वाहतूक शाखेला दिल्या. मात्र, त्यात कोणत्याही सुधारणा न होता उलटपक्षी नागरिकांच्या तक्रारी वाढत गेल्या. जोडीने हप्तेखोरीच्या तक्रारी देखील वाढल्या! या दोघांची दखल घेण्याचे काम शेवटी आ. जगताप यांनी केले.

आ. जगताप यांनी माग लावलेल्या रस्त्यांच्या कामांवर फोडले जात होते खापर!
नगर शहरात आ. जगताप यांच्या पाठपुराव्याने आणि आलेल्या निधीतून विविध रस्त्यांची कामे चालू आहेत. गेल्या काही महिन्यात नगर शहरातील रत्यांची कामे दर्जेदार होत असताना त्यातून भविष्यात चांगले रस्ते निर्माण होणार आहेत. वाहतूक कोंडी आणि समस्या यास ही रस्त्यांची कामेच कारणीभूत असल्याची टिपणी बाबा बोरसे हा अधिकारी खासगी चर्चेत करायचा! एकाचवेळी ही रस्त्यांची कामे करण्याची गरजच नव्हती असे मतही त्याने अनेकदा मांडले. आ. जगताप यांच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्षपणे टिकाटिपणी करणाऱ्या बोरसे याने आ. जगताप यांच्या विरोधात नागरिकांच्या भावना भडकविण्याचे काम केल्याची चर्चा आता झडू लागली आहे.

आ. जगताप यांनी दिला वृत्तमालिकेचा संदर्भ!
बोरसे याच्या आडमुठ्या आणि आडदांड भुमिकांमुळे नगरकरांना वाहतुक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने बोरसे याची तातडीने उचलबांगडी करण्याची मागणी जोर धरत असताना शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन बोरसे याच्या जागी दुसरा अधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली. आ. जगताप यांनी ही मागणी करताना ‌‘नगर सह्याद्री‌’च्या वृत्तमालिकेचा दुजोरा पोलिस अधीक्षकांना दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरसेवकांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरला! दोन दिग्गज नेते प्रवेश करणार

20-25 आजी-माजी नगरसेवक करणार शिंदे गटात प्रवेश | पदाधिकाऱ्यांचाही समावेश दोन दिग्गज नेते अन आजी-माजी...

शरद पवार-अजित पवार एकत्र!; बंद दाराआड चर्चा, चर्चांना उधाण…

पुणे / नगर सह्याद्री - शरद पवार आणि अजित दादा हा पवार कुटुंबियांसाठीच नाही...

मंत्री विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान; म्हणाले हा सन्मान…

लोणी / नगर सह्याद्री आधुनिक कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या नावाने स्थापन झालेल्या...

नगरमध्ये अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलन; १०० कलावंतांची ‘नांदी’, १०० कलावंतांचा ‘नृत्याविष्कार’

अहिल्यानगर। नगर सहयाद्री: - नगरमध्ये दि.२६ व २७ जानेवारी २०२५ रोजी आयोजित अखिल भारतीय विभागीय...