spot_img
महाराष्ट्रकांद्यावरील निर्यात बंदी उठलीच नाही ! "भाजपा नेत्यांना कांदे फेकून मारले पाहिजे"

कांद्यावरील निर्यात बंदी उठलीच नाही ! “भाजपा नेत्यांना कांदे फेकून मारले पाहिजे”

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवल्याचा मोठा गवगवा करण्यात आला. सोशल मीडियासह सर्वत्र शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. निर्यातबंदी उठवल्याचे समजताच कांद्याचे भावही वाढले. परंतु हा आनंद क्षणभंगुर ठरला. कारण, सरकारने ३१ मार्चपर्यंत अद्यापही कांदा निर्यात बंदी कायम ठेवल्याचं खुद्द केंद्रीय सचिवांनीच स्पष्ट केले. त्यामुळे वाढलेले भाव पुन्हा पूर्वपदावर आले. यावरून आता माजी गृहमंत्री आणि आमदार अनिल देशमुख यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी कांदा निर्यातबंदी ३१ मार्चपर्यंत लागू राहील असे अधिकृतपणे सांगितले. मागच्या दोन दिवसांपासून काही केंद्रीय मंत्री आणि खासदारांसह राज्यातील मान्यवर मंत्र्यांनी कांदा निर्यात खुलीहोण्याबाबत माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिल्याने पण दोन दिवस होऊनही अधिकृत नोटीफिकेशन न आल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम होता.

त्यानंतर, सचिवांच्या पातळीवर असे वक्तव्य प्रसिद्ध होत असल्याने केंद्र सरकारमध्ये आणि एकूणच मंत्री आणि अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याचे चित्र आता समोर येत आहे. त्यावरुनच, आता विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आ. अनिल देशमुख यांनी व्हिडिओ शेअर करत भाजपा नेत्यांवर बोचरी टीका केली.

”भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कांद्याची निर्यात बंदी उठवल्याचा मोठा डांगोरा पिटला, शेतकऱ्यांचे हित वगैरे बऱ्याच बाष्कळ गप्पा मारल्या. पण, आज केंद्रीय सचिव रोहित कुमार सिंह यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ३१ मार्च पर्यंत कांदा निर्यातबंदी कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणामुळे असंख्य शेतकरी बांधवांचे संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे २००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असं रिपोर्ट सांगतोय. या भाजपच्या नेत्यांना शेतकऱ्यांनी कांदे फेकून मारले पाहिजेत व निवडणुकीत धडा शिकवला पाहिजे”, अशी जबरी टीका अनिल देशमुखांनी केली आहे.

दरम्यान, पीटीआयच्या वृत्तानुसार निर्यात बंदी खुली झाली नसून डिसेंबर ०८ ला लागू झाल्यानंतर ती ३१ मार्चपर्यंत कंटिन्यू लागू राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. केंद्रीय ग्राहक मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी निर्यात खुली झाल्याची चर्चा केवळ अफवाच ठरली असल्याचे चित्र स्पष्ट झालं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...

‘जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त होणार’; मंत्री विखे पाटील यांची मोठी माहिती..

पुणे । नगर सहयाद्री:- राज्यातील जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी समिती...

राजकारणात खळबळ!, शरद पवार-अजित पवार आज एकत्र येणार?

मुंबई । नगर सहयाद्री:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल...