spot_img
अहमदनगरवडिलांचे कारनामे मुलाला भोवले; 'या' गावचे लोकनियुक्त युवा सरपंच अपात्र! अशी कोणती...

वडिलांचे कारनामे मुलाला भोवले; ‘या’ गावचे लोकनियुक्त युवा सरपंच अपात्र! अशी कोणती चुक नडली ?

spot_img

श्रीरामपूर । नगर सहयाद्री:-
तालुक्यातील मुठेवाडगावचे सरपंच सागर मुठे यांच्या वडिलांनी जमिनी लगतच्या शिवरस्त्यावर अतिक्रमण केले असल्याच्या कागदोपत्री पुराव्यावरून जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी सरपंच सागर मुठे यांना अपात्र घोषित केले. तर उपसरपंच विजया भोंडगे यांचेही सरकारी जागेवर घरकुलाचे अतिक्रमण सिध्द झाल्याने नाशिक उपायुक्त सागर निलेश यांनी विजया भोंडगे यांना अपात्र ठरविले.

आमदार लहू कानडे गटाचे सत्ताधारी सरपंच-उपसरपंच अपात्र झाल्याने एकमेव महिला सदस्य पंचायतीमध्ये राहिल्या असून विरोधी विखे मुरकुटे गटाचे सहा सदस्य पात्र राहीले आहेत. मुठेवाडगाव ग्रामपंचायत निवडणूक २०२१ मध्ये होऊन नऊ सदस्य संख्याबळात आ. कानडे गटाचे पाच सदस्य तर विखे-मुरकुटे गटाचे चार सदस्य निवडून आले. सागर ज्ञानदेव मुठे हे बहुमतातील आ. कानडे गटाचे लोकनियुक्त सरपंच झाले. तर निर्मला पाचपिंड उपसरपंच झाल्या. निवडणुकीनंतर ग्रामपंचायतची सूत्रे हातात ठेवणाऱ्या परिवारातील एक महत्वाचे उमेदवार पडल्याने हा पराभव जिव्हारी लागला. त्यामुळे सव्वा महिन्यात त्या जागेवर निवडून आलेल्या लंकाबाई दिनकर मुठे यांच्यावर प्रथम अतिक्रमण केस दाखल केली.

येथून पुढे कायम दोन्ही गटाने एकमेकांच्या सदस्यांविरूद्ध एकमेव अतिक्रमण या मुद्दावरच आज अखेर तब्बल पावणे चार वर्षे घेरण्यास सुरूवात केली. पुढे दोन जागांची पोटनिवडणूक होऊन विखेसदस्या लंका मुठे यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे अतिक्रमणाची तक्रार दाखल केली म्हणून विखे-मुरकुटे गटाने गोरख जाधव व उज्वला दिघे या आ. कानडे गटाच्या सदस्यांविरूद्ध अतिक्रमण केस दाखल केली. या पहिल्या केसेसमध्ये आ. कानडे गटाचे सदस्य अपात्र झाले. तर विखे मुरकुटे गटाच्या लंका मुठे यांच्याबाजूने निकाल लागल्याने त्या पात्र राहिल्या. या निकालाविरोधात कानडे गटाने नाशिक उपायुक्त यांच्याकडे अपील करूनही दोन्ही सदस्य अपात्र राहिले. छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात केस दाखल करण्यात येऊनही मेरीटवर दोन्ही सदस्यांना

मुरकुटे गटांनी दोन्ही जागा पटकावल्या. विखे-मुरकुटे गटाचे सूत्रधार डॉ. शंकर मुठे यांच्या पत्नी संगीता शंकर मुठे व किशोर साठे हे मताधिक्याने विजयी झाले. या पोटनिवडणुकीत सरपंच सागर मुठे यांनी संगीता शंकर मुठे यांच्याविरुद्ध अतिक्रमण तक्रार दाखल केली. निवडणूक अधिकाऱ्यांनी ती तक्रार फेटाळून लावल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले. हे अपील करताना ज्ञानेश्वर जयवंत मुठे व अनिल रमेश मुठे या दोन सदस्यांविरूद्धही तक्रारी दाखल केल्या. त्यामध्ये त्यांचे अर्ज फेटाळल्याने दोघेही पात्र राहिले. पुढे नाशिक उपायुक्त अपिलातही ते पात्र राहिले. नंतर लंका मुठे यांच्याविरुद्ध पुन्हा तक्रार दाखल केल्याने विखे मुरकुटे गटाने उपसरपंच विजया भोंडगे यांच्याविरुद्ध घरकुल अतिक्रमण तक्रार दाखल केली.

जिल्हाधिकारी निकालात त्या अपात्र ठरल्या. नाशिक उपायुक्त अपिलात त्यांना स्थगिती मिळाली. या दरम्यान सदस्य ज्ञानेश्वर जयवंत मुठे यांनी सरपंच सागर मुठे यांच्या वडिलांनी मुठेवाडगाव माळवाडगाव शिवरस्त्यावर गट क्र. १८ जमिनीतून अतिक्रमण केल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केली. या केसचा निकाल लागण्यापूर्वी सरपंच मुठे यांनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु ती फेटाळण्यात आली. उपसरपंच विजया भोंडगे यांच्याविरूद्ध नाशिक उपायुक्तांकडे नवीन अपील दाखल करण्यात आले होते. त्या अपीलात उपायुक्त सागर निलेश यांनी उपसरपंच

विजया भोंडगे यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी यांचा निकाल जैसे थे ठेऊन त्यांना अपात्र ठरविले. विखे- मुरकुटे गटाच्या बतीने अहमदनगर नाशिक येथे अॅड. अमोल धोंडे यांनी काम पाहिले तर छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात अॅड. विवेक तारडे यांनी काम पाहिले. आता मुठेवाडगाव ग्रामपंचायतमध्ये सहा जागा विखे-मुरकुटे, एक जागा आ. कानडे गट तर दोन जागा अपात्र असे नऊ जागेचे बलाबल आहे. या निकालामुळे ग्रामपंचायत मध्ये आपली सत्ता येणार असल्याने विखे-मुरकुटे गटात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विधानसभा निकालानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Manoj Jarange Patil News : अरे आम्ही मैदानातच नाहीत. तरी तुम्ही आम्हाला फेल झाला...

तुमचे व्हॉट्सॲप कुठे कुठे आहे चालू? या युक्तीने कळेल क्षणार्धात

नगर सहयाद्री वेब टीम :- WhatsApp हे एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे, जे प्रत्येकजण...

महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजणार; लवकरच मोठा निर्णय होणार?

Politics News: राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारून महाविकास आघाडीला धूर चारत पुन्हा...

राज्याला मिळाला सर्वात कमी वयाचा आमदार; रोहित पाटलांचा दणदणीत विजय

Politics News: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती...