spot_img
आरोग्यसर्वांनाच भीती असणाऱ्या चीनमधील 'त्या' रहस्यमयी आजाराची भारतात एन्ट्री? 'येथील' 2 मुलांत...

सर्वांनाच भीती असणाऱ्या चीनमधील ‘त्या’ रहस्यमयी आजाराची भारतात एन्ट्री? ‘येथील’ 2 मुलांत इन्फ्लूएंझासारखीच लक्षणं

spot_img

नगर सह्याद्री टीम : चीनमध्ये सध्या लहान मुलांमध्ये खोकला, श्वसनसंदर्भात आजार पसरले आहेत. हा आजार इन्फ्लूएंझा सारखा असल्याचे म्हटले आहे. परंतु याने तेथील दवाखाने भरले आहेत. लहान मुलांना हा आजार होतोय. जगभरातील देशांना या आजाराची धास्ती आहे. दरम्यान उत्तराखंडमध्ये चीनमध्ये पसरलेल्या या आजाराबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आरोग्य विभागाने अलर्ट जारी केल्यानंतर सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. उत्तराखंडच्या बागेश्वरमध्ये दोन मुलांमध्ये इन्फ्लूएंझासारखीच लक्षणं आढळून आल्यानंतर यंत्रणा अलर्ट आली आहे. या संदर्भात मुलांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. कोरोनानंतर आता देशातील जवळपास सर्व राज्ये चीनमधून उद्भवलेल्या या आजाराबाबत सतर्क आहेत.

उत्तराखंडमधील आरोग्य विभागाने चीनमध्ये मायक्रो प्लाझ्मा न्यूमोनिया आणि इन्फ्लूएंझा प्रवाहाच्या प्रसाराबाबत दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात अलर्टही जारी करण्यात आला आहे. आता अलर्टनंतर बागेश्वर जिल्ह्यातील दोन मुलांमध्ये इन्फ्लूएंझासारखी लक्षणे दिसून आली आहेत.

दोघांचे नमुने तपासणीसाठी सुशीला तिवारी रुग्णालयात पाठवण्यात आले असून रिपोर्टची वाट पाहत आहेत. बुधवारी दोन मुलांना बागेश्वर येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. इन्फ्लूएंझा सारख्या लक्षणांसह श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन डॉक्टरांनी नमुने सुशीला तिवारी मेडिकल कॉलेज, हल्दवणी येथे तपासणीसाठी पाठवले आहेत.

तपासाचा रिपोर्ट चार ते पाच दिवसांत येईल. रिपोर्ट समोर आल्यानंतरच हा व्हायरस तोच आहे की नाही याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल. याबाबत सध्या आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणाही अलर्ट झाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एमआयडीसीत टोळक्याचा तरूणावर कोयत्याने हल्ला; नेमकं काय घडलं

अहिल्यानगर | नगर सह्याद्री एमआयडीसी परिसरात एका टोळयाने तरूणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना समोर आली...

ढगाळ वातावरण! कांदा उत्पादक चिंतेत; काय होणार परिणाम

श्रीगोंदा | नगर सह्याद्री श्रीगोंदा तालुयामध्ये कांदा काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. परंतु  सध्या ढगाळ...

काळजी घ्या! उष्माघाताचे ‘इतके’ रुग्ण; आरोग्य विभागाने दिला हा इशारा

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले असले तरी मार्च महिन्याच्या...

चुलत्याच्या कृपेनं बरं चाललंय, अजितदादादांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ, काय म्हणाले पहा

बीड / नगर सह्याद्री - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्या वक्तव्यानंतर राष्ट्रावादी काँग्रेसचे दोन्ही गट...