spot_img
अहमदनगरनिवडणूक संपली; ताबेमारी सुरू, टोळ्यांचा म्होरक्या कोण?

निवडणूक संपली; ताबेमारी सुरू, टोळ्यांचा म्होरक्या कोण?

spot_img

नगर शहरात कायद्याचा नव्हे, काय द्यायचा धाक
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
मोकळा भूखंड दिसला की त्यावर ताबा मारण्याचा जसा एक प्रकार आहे तसाच दुसरा प्रकार आहे तो, भूखंडच हडप करण्याचा! सातबारा सदरी नाव असतानाही तुमचा त्या भूखंडाशी काहीही संबंध नसल्याचे दाखवून तो भूखंडच हडप करण्याचा सैतानी प्रकार सध्या नगर शहरात सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ताबेमारी आणि भूखंड हडप करणार्‍या टोळ्यांनी घेतलेली विश्रांती आता संपली असून या टोळ्या विधानसभेच्या निकालानंतर अधिक गतीमान झाल्याचे दिसून येत आहे. या टोळ्यांना नक्की कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न सामान्य जनतेला पडला असला तरी त्याचे उत्तर पोलिसांकडे नक्कीच आहे. मात्र, हप्तेखोरी आणि ठोक स्वरुपात मिळणारा मलिदा यामुळे त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली असल्याचे दिसते. नगर शहरात या मुद्यावर मोठी दहशत निर्माण झालेली असून त्यास सर्वस्वी जबाबदार टोळीचा म्होरक्या नगरकरांसमोर आणण्याचे काम होण्याची आवश्यकता आहे.

नगर शहरात ताबेमारी सुरूच असून या अनुषंगाने गेल्या आठवडाभरात दोन गुन्हे दाखल नगरमध्ये वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. अतिक्रमण करून ताब्याचा प्रयत्न एका ठिकाणी झाला आहे. या सर्वात गंभीर बाब म्हणजे ज्याच्या मालकीचा प्लॉट आहे, त्याला प्रचंड भिती आणि दहशत दाखवली जाते आणि त्यातून अत्यंत नाममात्र किंमत हाती देऊन तो भूखंडच नावावर करून घेतला जात असल्याचेही समोर आले आहे. यातूनच तक्रार न देता त्या भूखंडाचा श्रीखंड करणार्‍या टोळ्या वाढीस लागल्या असताना या प्रकरणात आता पोलिस अधीक्षकांनीच लक्ष घालण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

उपनगरांत मोयाच्या जागांवर बेकायदेशीर ताबा मारण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. लोकवस्ती वाढू लागल्याने जमिनीला सोन्याचा भाव आले आहेत. शहरासह उपनगरात सामान्यांना धमकावून भूखंडावर ताबा मिळविण्याचे प्रकार काही केल्या थांबायला तयार नाही. निवडणुकीत ताबेमारीचा मुद्दा जोरकसपणे समोर आल्यानंतर हे प्रकार थांबले होते. मात्र, मागील आठ दिवसांत एमआयडीसी आणि कोतवाली पोलिस ठाण्यात ताबेमारीचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यापूर्वीही मोयाचे भूखंड बळकावल्याच्या घटना घडलेल्या आहेत. भीतीपोटी अनेकजण तक्रार न देता कमी भावात प्लॉट विकून टाकत असल्याचेही अनेक प्रकार घडत आहेत. त्यामुळे सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मोकळ्या भूखंडाचा शोध घेत सुरुवातीला काही लोकांना हाताशी धरून अतिक्रमण करण्यात येते. अशावेळी जागा मालक जागा वाचविण्याचा प्रयत्न करतात. परंतु, त्यांनाही कागदपत्रांची भीती दाखविली जाते. वादग्रस्त भूखंड कमी भावात खरेदी करून त्यावर ताबा टाकणारी मोठी टोळीच नव्याने कार्यन्वीत झाली आहे. सावेडी उपनगरासह अन्यत्र व्यापार्‍यांनी गुंतवणूक म्हणून काही भूखंड घेतले. मात्र, त्यात वाद असल्याचे दाखवून, प्रसंगी तलाठ्यांना हाताशी धरुन कागदपत्रांमध्ये फेरफार करत वारसांचे वाद असल्याचे दाखविणारी एक मोठी टोळीच आता सक्रिय झाली आहे. या टोळीला राजाश्रय असल्याने झंझट नको या नावाखाली अनेक व्यापार्‍यांनी त्यांचे हे भूखंड मातीमोल भावाने देऊन टाकले तर काहींना एक रुपयाही न देता परस्पर बाहेर काढण्यात आल्याचे प्रकारही घडले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....