spot_img
ब्रेकिंगधुळे हादरले! एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

धुळे हादरले! एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

spot_img

धुळे | नगर सह्याद्री

धुळे शहरामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धुळे शहरातील समर्थ कॉलनी परिसरात एकाच कुटुंबांतील चौघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आई वडील, आणि दोन मुलांनी आत्महत्या केल्या असून या भयंकर घटनेने जिल्हा हादरुन गेला आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरु आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकाच घरातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धुळ्यामध्ये घडली आहे. आई वडील आणि दोन मुलांचा मृतांमध्ये समावेश असून धुळे शहरातील समर्थ कॉलनीमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत तपास सुरु केला आहे. प्रवीण मानसिंग गिरासे, गीता प्रवीण गिरासे व मुलं मितेश प्रवीण गिरासे, सोहम प्रवीण गिरासे असे आत्महत्या करणार्‍या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. यापैकी प्रविण गिरासे यांनी गळफास घेऊन तर कुटुंबातील इतर तिघे जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. आई वडिलांनी दोन सोन्यासारख्या लेकरांसोबत आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या सामुहिक आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आले नसून संपूर्ण कुटुंबाने इतया टोकाचा निर्णय का घेतला असावा? असा सवाल आता उपस्थित होत आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...