spot_img
अहमदनगरविकासकामांसाठी अजित दादांनी दरवाजा उघडला अन 'तो' निधी नगरपर्यंत आला; आमदार जगताप...

विकासकामांसाठी अजित दादांनी दरवाजा उघडला अन ‘तो’ निधी नगरपर्यंत आला; आमदार जगताप नेमकं काय म्हणाले ते पहा…

spot_img

एकविरा चौक ते तपोवन रोड रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन
अहमदनगर । नगर सहयाद्री
आपण नुकताच ७८वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. एवढ्या वर्षांमध्ये नगर शहराच्या विकास कामासाठी इतिहासात पहिल्यांदाच १५० कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. या कामासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दरवाजा वाजवला आणि त्यांनी तो उघडला व तो निधी नगरपर्यंत आला. या माध्यमातून विकासाचा झंजावत सुरू झाला आणि यामध्ये नगरकरही मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

एकविरा चौक ते तपोवन रोड जुना पिंपळगाव रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेवक विनीत पाऊलबुधे, निखिल वारे, माजी नगरसेविका दीपाली बारस्कर, मीनाताई चव्हाण, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, डॉ. सागर बोरुडे, सुनील त्रिंबके अदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

एकविरा चौक ते तपोवन रोड जुना पिंपळगाव रस्ता हा पूर्वी दुर्लक्षित होता. या ठिकाणी अनेक पुढार्‍यांनी नारळ फोडली, मात्र त्या रस्त्याचे काम मीच पूर्ण केले. त्यामुळे नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहेत. तपोवन रस्ता हा बाजारपेठ म्हणून ओळखला जाईल. रस्त्यांचे जाळे निर्माण केल्यानंतर व्यापारीकरण व रोजगार निर्मिती होत असते. डीपी रस्त्यांच्या विकासकामांबरोबर अंतर्गत रस्त्यांची कामे देखील हाती घेतली आहेत. या कामासाठी शासनाकडून ४४ कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत. असेही आमदार संग्राम जगताप म्हणाले.

संपत बारस्कर म्हणाले की, सावेडी उपनगराच्या विकासाला आमदार संग्राम जगताप यांनी मोठा निधी मंजूर करून दिला असल्यामुळे गती प्राप्त झाली आहे, तपोवन रोड, एकविरा चौक, पारिजात चौक ते टेलिफोन ऑफिस पर्यंत रस्त्याचे काम मंजूर असून पहिल्या टप्प्यात तपोवन रोड ते एकविरा चौकापर्यंत पूर्ण होणार आहे, याचबरोबर तलाठी कार्यालय ते राजनंदिनी हॉटेलपर्यंतचा रस्ता देखील पूर्ण होणार आहे, पाऊलबुद्धे शाळा ते सिटी प्राईड हॉटेल पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करण्याचे काम मार्गी लागणार आहे.

दिलेल्या संधीचे सोने केले: जगताप
राज्य सरकारच्या माध्यमातून नगर शहरातील विविध भागांतील रस्त्यांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला असून या कामाच्या भूमिपूजनासाठी गेल्यावर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकासाचे वाजत गाजत स्वागत करत फटायाची आतिषबाजी करतात. नागरिकांचे असलेले प्रेम पाहून मनाला समाधान वाटते, नागरिकांनी दिलेल्या संधीचे मी सोने करू शकलो व विकासकामांतून नागरिकांचा विश्वास संपादन केला असल्याचे मत आमदार जगताप यांनी यावेळी व्यक्त केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा, अन्यथा… आज कुणाच्या राशीत काय?

मुंबई। नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य कदाचित आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आपले संतुलन...

बाउन्सरची दहशत मोडून काढणार ‘राऊळबुवा’!

दाखवायचं कोणाला आणि झाकायचं कोणाचं ? एक कुटुंब महिन्याला कर्मचार्‍यांचे पगार तर दुसरे कुटुंब...

Accident News: बस-आयशरच्या भीषण अपघातानं शहर हादरलं; एकाचवेळी सहा ठार, कुठे घडली घटना?

Accident News: वडीगोद्री मार्गावरील शहापूर जवळील वळणावर बस आणि संत्रा वाहतूक करणार्‍या आयशरचा भीषण...

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकावर तलवारीने हल्ला? हैराण करणार कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत २ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये डी जे मागे...