spot_img
अहमदनगरमहायुतीच्या नेत्यांच्या फ्लेक्सची विटंबना; राष्ट्रवादी, भाजप पदाधिकारी आक्रमक, काय म्हणाले पहा...

महायुतीच्या नेत्यांच्या फ्लेक्सची विटंबना; राष्ट्रवादी, भाजप पदाधिकारी आक्रमक, काय म्हणाले पहा…

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शहरात सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी येणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या स्वागतार्थ आ.संग्राम जगताप यांच्या वतीने शहरात ठिकठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर रोड वरील महानगरपालिका समोरील लावेल्या फ्लेक्स बोर्डची अज्ञात व्यक्तींनी विटंबना केली आहे. ही बाब शुक्रवारी सकाळी लक्षात येताच राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपचे पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आक्रमक झालेल्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणा देत घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केले. यावेळी मोठ्याप्रमाणात पोलीस उपस्थित होते.

यावेळी भाजपचे महेंद्र गंधे, कुमारसिंह वाकळे, अजिंक्य बोरकर, वैभव ढाकणे, तुषार पोटे, निलेश बांगरे, भागवत कुरधरने, अमित गटणे, अशोक चोभे, योगेश ठुबे, दिनेश जोशी, भाऊ पुंड, सचिन पवार, गणेश गोरे, दादा पांडुळे, योगेश खताळ, मनीष फुलडहाळे, वैभव दळवी, संतोष फुलारे, चेतन लखापती, गौरव कचरे आदी उपस्थित होते.

यावेळी तुषार पोटे म्हणाले, आ.संग्राम जगताप यांनी नगर शहरात एव्हढ्या मोठ्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करून इतिहास रचला आहे. यास्पर्धेच्या परितोषिक वितरण समारंभास राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अनेक मंत्री येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी हे फ्लेक लावले आहेत. पण काही जिहादी व्रुतीच्य समाजकंटकांना हे सहन झालेले नसल्याने त्यांनी या बोर्डाची विटंबना केली आहे. हा प्रकार या आधीही घडला आहे. मात्र आता आम्ही हे सहन करणार नाही.

अजिंक्य बोरकर, शहरातील जिहादींना भगव्या वातावरणाची अडचण झाली आहे. त्यांच्यात समोर येण्याची हिम्मत राहिली नसल्याने पाठीमागून अशी तुच्छ प्रकार करीत आहेत. शहरात या जिहादींचे मोठ्याप्रमाणात अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्याप्रमाणात त्रास होत असल्याने महानगरपालिकेच्या आयुक्तांनी रस्त्यावरील अतिक्रमण विरोधी मोहीम राबवावी. त्यांनी कारवाई न केल्यास आम्हीप्रत्यक्षात रस्त्यावर उतरावे लागे.

वैभव ढाकणे म्हणाले, राज्याच्या नेते मंडळींच्या स्वागतासाठी लावलेले फ्लेक्स बोर्ड हे भगव्या रंगाचे असल्यानेच या जिहादी वृत्तींच्या लोकांनी या भगव्याचा अपमान केला आहे. त्यांना जर या भगव्या रंगाची जर एव्हढी अडचण होत असेल तर त्यांनी राज्यात असलेल्या महायुती सरकारच्या योजनांचा लाभ घेणे सोडून द्यावे. हे लोकच सर्व सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात पुढे असतात. या लोकांनी आमच्या भगव्याचा व आमच्या नेत्यांचा अपमान केला आहे. हे आम्ही सहन करणार नाहीच.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कारागृहातून आरोपीने पाठवले साक्षीदाराला धमकीचे पत्र; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील साई कॉलनी परिसरात साक्षीदाराला पत्राद्वारे धमकी दिल्याचा प्रकार घडला....

पुण्यात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार; आयुषच्या हत्येची धक्कादायक माहिती उजेडात

पुणे / नगर सह्याद्री - पुणे शहरातील नाना पेठ परिसरामध्ये झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील...

शहरात साहित्योत्सव रंगणार; संमेलनाची तयारी पूर्ण, ११, १२ सप्टेंबरला भरगच्च कार्यक्रम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य...

शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही!; मंत्री विखे पाटील

मंत्री छगन भुजबळ यांची मागणी फेटाळली मुंबई । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीने...