spot_img
अहमदनगरमतदानयंत्र पडताळणीची मागणी म्हणजे बालिशपणा; खा नीलेश लंके

मतदानयंत्र पडताळणीची मागणी म्हणजे बालिशपणा; खा नीलेश लंके

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
भाजपचे उमेदवार सुजय विखे यांची ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी म्हणजे, बालिशपणा आहे, असा टोला खासदार नीलेश लंके यांनी लगावला. एवढी मोठी निवडणूक यंत्रणा राबली. महसूल विभाग कार्यरत होता. विशेष म्हणजे, महसूलचा कारभार त्यांच्या वडिलांच्या राधाकृष्ण विखे यांच्या हाती होता. तरी आक्षेप घेणं म्हणजे, त्यांच्याच पक्षाला घरचा आहे, असे नीलेश लंके यांनी म्हटले आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुजयव विखे यांचा नीलेश लंके यांनी पराभव केला. ही लढत लक्षवेधी ठरली. अटीतटीच्या लढतीत सुजय विखे यांचा पराभव झाला. नीलेश लंके यांचा २९ हजार मतांनी विजयी झाले. हा पराभव विखे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. सुजय विखे यांनी लगेचच अहमदनगर जिल्हा प्रशासनामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन पडताळणीची मागणी केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य केली असून, जिल्हा प्रशासन आता मतदान यंत्रांचे मॉकपोल घेण्याची तयारी करत आहे. सुजय विखे यांची मागणी मान्य होताच, खासदार नीलेश लंके यांनी यावरून विखेंवर निशाणा साधला.

त्यांना नगर येथे खासदार लंके यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. ते म्हणाले, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन पडताळणीची मागणी करणे म्हणजे बालिशपणा आहे. वास्तविक लोकसभा निवडणुकीत अहमदनगरचे जिल्हाधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी होते. सुजय विखे यांचे वडील महसूलमंत्री असल्याने त्यांचाच आखत्यारीतील महसूल विभागाच्या हातात निवडणुकीच्या सर्व कारभार होता. तरी देखील त्यांनी, असा आक्षेप घेणे म्हणजे, त्यांच्याच पक्षाला घरचा आहेर आहे, असेही लंके यांनी म्हटले.

माझ्या मतदारसंघात मी बारकाईने पाहिलेले आहे. त्याचा आम्ही अभ्यास केला आहे. माझ्या पारनेर विधानसभा मतदासंघातील ज्या ४० मतदान केंद्रांवरील मशीनची पडताळणी होणार आहे. त्यात एक मताचाही फरक पडणार नाही. काही होणार नाही, तर त्यावर चर्चा कशाला करायची? पण विखेंना आता समाजापुढे जायचे आहे, तर कसे जायचे? समाजाला हे सांगू शकत नाही की, आम्ही आमच्या गुणांमुळे पराभूत झालो. त्यासाठी मशीनमध्ये गडबड आहे, मशीन मॅनेज केल्या आहेत, हे सांगण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. मात्र पडताळणीचा हा निकाल देशात जाणार आहे. त्यात काही गडबड आढळल्यास विरोधी पक्षांकडून ईव्हीएम मध्ये गडबड होते, या आरोप खरा होईल, असेही लंके म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...