पारनेर । नगर सहयाद्री:-
शिष्टमंडळानी केलेल्या मागण्यासाठी लवकरच पाठपुरावा करून विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ. काशिनाथ दाते यांनी दिली. पारनेर तालुक्यातील निघोज परिसरातील परिसरातील शिरसुले, वडगाव , सोनवणे वस्ती, लामखडे वरखडे वस्ती कवाद वस्ती, लाळगे वस्ती, तनपुरे वस्ती या ठिकाणी विविध विकासकामे करण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी ते बोलत होते. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त रोहिदास लामखडे, अनिल लंके, विठ्ठलराव कवाद , स्कूल कमीटीचे अध्यक्ष किसनराव घोगरे, निघोज सोसायटीचे संचालक हिरामण सोनवणे आदिंनी यासाठी पुढाकार घेतला असून यामध्ये जलसिंचन बंधारे, शाळा वस्ती दुरुस्ती तसेच नवीन खोल्या उपलब्ध करून देणे, परिसरातील रस्ते तसेच विजेचा प्रश्न, कुकडी डावा कालवा पाणी प्रश्न माग लावण्याची मागणी केली होती.
निवेदनावर मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे माजी अध्यक्ष प्रभाकरशेठ कवाद, रोहिदास लामखडे, विठ्ठलराव कवाद, अनिल लंके, ग्रामपंचायत सदस्य शंकर गुंड, ग्रामपंचायत सदस्या इंदूबाई घोगरे, शंकर लंके, बाळासाहेब लंके, बाबाजी लंके, शशिकांत कवाद, गणेश लंके , बन्सी वाढवणे, सिताराम लंके, विशाल गुंड, दत्तात्रय गुंड, संतोष लंके, अनंथा लंके, गणेश शेटे, कान्हू लंके, मच्छिंद्र लंके, पोपट कवाद, विश्वनाथ शेटे, विठ्ठल कवाद, शांताराम कवाद, संदीप कवाद, मिनीनाथ कवाद, कानिफनाथ कवाद, संजय तनपुरे, रमेश लंके, किरण गुंड, सागर गुंड, सचिन गुंड, संपत गुंड, प्रदिप लंके, रामचंद्र निषाद, वर्षा लंके, बाबाजी शेटे, धर्मनाथ भुकन, किसन घोगरे, भगवान लंके, हिराभाउ सोनवणे, विनायक सोनवणे, सुनिल लंके, सुभाष सोनवणे, भगवान सोनवणे, शिवाजी लंके आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आ. काशिनाथ दाते कार्यक्षम आमदार
आमदार काशिनाथ दाते यांनी निघोज-अळकुटी जिल्हा परिषद गटाचा दौरा करुन जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. विकासाचा आराखडा घेऊन तसेच संबंधित ग्रामपंचायत व समाजसेवी संस्था यांचे रितसर पत्र घेऊन शिष्टमंडळाने निवेदनाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मांडले आहेत. दाते सर हे कार्यक्षम आमदार आहेत. हे गेली सहा महिन्यांत सिद्ध झाले आहेत. आ. काशिनाथ दाते यांच्या माध्यमातून मतदारसंघाचे प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहेत.
– प्रभाकरशेठ कवाद, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस