अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:-
अहिल्यानगरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी प्रेम विजय पाथरे (रा. फोर्जिंग कॉलनी, वडगावगुप्ता शिवार, अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, नोव्हेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत वडगावगुप्ता शिवारातील दुध डेअरी चौक ते शेंडी बायपास रस्त्यावरील एका शेतात आरोपीने पीडितेला बळजबरीने नेले. तिथे तिच्यावर अनेकदा शारीरिक अत्याचार केले.
तसेच, कोणाला सांगितल्यास कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी पीडितेने याबाबत मौन बाळगले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच 9 जुलै 2025 रोजी रात्री 9:24 वाजता आरोपीवर गुन्हा नोंदवला गेला. तपासासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव आणि प्रभारी सपोनि चौधरी काम पाहत आहेत.