Maharashtra Crime New : विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ३३ वर्षीय महिलेला जबरदस्ती निर्जनस्थळी ओढत नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळू शिर्के असं आरोपीचे नाव आहे.
पीडित महिला माहेरी जाण्यासाठी निघाली होती. तेव्हा आरोपी बाळू शिर्केने दुचाकीवरून तिचा पाठलाग सुरू केला. रस्त्यावर कुणीही नसल्याचे पाहून त्याने महिलेला बळजबरीने ओढत एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आरोपी पीडितेला त्याच अवस्थेत सोडून पळून गेला. सदरचा प्रकार लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ठाकूरसाई गावात घडला आहे.
हे गाव मावळच्या पवनानगर भागात येते. याठिकाणी राहणाऱ्या महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. घटनास्थळापासून बऱ्याच लांब असलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी पीडितेचा पाठलाग करताना पोलिसांना दिसून आले. विशेष म्हणजे आरोपीने घातलेल्या जॅकेटमुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिांनी आठ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे.