spot_img
अहमदनगरनगर पुन्हा हादरले! एकाच कटूंबातील तिघांची आत्महत्या? घटनास्थळी आढळल्या दोन चिठ्ठ्या..

नगर पुन्हा हादरले! एकाच कटूंबातील तिघांची आत्महत्या? घटनास्थळी आढळल्या दोन चिठ्ठ्या..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यातील संगमनेर शहरातील वाडेकर गल्ली येथे राहणाऱ्या दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.०३) दुपारी ४ नंतर समोर आली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. या दाम्पत्याच्या मोठ्या मुलाने साधारण सात दिवसांपूर्वी पुण्यात, तर लहान मुलाने यापूर्वी वाडेकर गल्ली येथील घरात आत्महत्या केली होती. गणेश मच्छिंद्र वाडेकर (वय ५२), गौरी गणेश वाडेकर (वय ४८ रा. वाडेकर गल्ली) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत.

याप्रकरणी पुतण्या प्रशांत वाडेकर (रा. मोगरा कॉलनी, पंपिंग स्टेशन, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यची नोंद केली आहे. गणेश वाडेकर हे संगमनेर नगर परिषदेत कर्मचारी होते, त्यांनी काही महिन्यांपूर्वी ऐच्छिक सेवानिवत्ती घेतली होती. गौरी वाडेकर या घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात परिचारिका म्हणून सेवेत होत्यघराच्या पहिल्या मजल्यावर बेडरूममध्ये गणेश वाडेकर यांनी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेतला होता, त्याच बेडरूमच्या समोरील बेडरूममध्ये गौरी वाडेकर यांनी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेतलेला होता.

पोलिसांनी त्या दोघांनाही खाली काढून घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तपासणी करत त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. उत्तरीय तपासणीकरिता त्यांचे मृतदेह नेण्यात आले. गणेश वाडेकर यांचा मोठा मुलगा श्रीराज वाडेकर (वय: २१) याने सात दिवसांपूर्वी पुणे येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. लहान मुलगा श्रेयस वाडेकर (वय: १६) याने दिड वर्षापूर्वी वाडेकर गल्ली येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

घटनास्थळी आढळल्या चिठ्ठ्या
पती-पत्नीने आत्महत्या करण्याआधी दोन चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या. त्यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना या दोन चिठ्ठ्या मिळाल्या आहेत. वाडेकर यांच्या मुलाचा पुण्यात मृत्यू झाला होता, त्याच्या तपासकामात त्यांनी वाकड पोलिसांविषयी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये दोन गटात राडा; मकर संक्रांतीच्या दिवशी नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- मकरसंक्रांतीच्या दिवशी गाणे वाजवण्यावरून व पतंग उडविण्याच्या वादातून निलक्रांती चौक परिसरात...

..अन् नायलॉन मांजाने आयुष्याचा दोर कापला, राज्यात ‘ईतक्या’ जणांचा मृत्यू

Maharashtra News: मकर संक्रांतीच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे राज्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर...

हवामान विभागाची महत्वाची अपडेट; थंडी गायब? ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता!

Weather Update: राज्यामध्ये थंडी गायब झाली असून पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे...

विखे परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक : सौ. शालिनीताई विखे पाटील

  अळकुटी महाविद्यालयात लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात निघोज...