spot_img
अहमदनगरAhmednagar: पुन्हा नगर हादरलं! वाढदिवसाला केक वर नव्हे तर तरुणावर वार

Ahmednagar: पुन्हा नगर हादरलं! वाढदिवसाला केक वर नव्हे तर तरुणावर वार

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
नगर शहरात पुन्हा एक धक्कादायक प्रकार घडल्याची बातमी समोर आली आहे. मित्रांच्या वाढदिवसाला गेलेल्या तरुणांवर धारदार शस्राने वार केल्याचे घटनेने पुन्हा शहर हादरले आहे. सचिन मुरलीधर ठाणगे (वय २९ रा. दातरंगे मळा ) असे जखमी तरूणाचे नाव आहे.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन ओमरत्न भिंगारदिवे (रा. वारूळाचा मारूती), राहुल रोहकले (रा. रोहकले गल्ली, नालेगाव), गणेश भुजबळ (रा. दातरंगे मळा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मित्रांच्या वाढदिवसाला जखमी सचिन ठाणगे मित्र अमित चित्राल व निखिल भिसे यांच्यासह वारूळाचा मारूती कमानीजवळ गेले होते. यावेळी ओमरत्न, राहुल व गणेश हे तिघे तेथे होते. दरम्यान फिर्यादी सचिन ठाणगे आणि त्यांच्यात एकमेकांकडे पाहण्यावरून वाद झाले.

त्यानंतर वादाचे रूपांतर मारहाणी मध्ये झाले. दरम्यान मारहाणीमध्ये आरोपींनी धारदार शस्राने सचिन वर हल्ला करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

​कामरगावात दुकानदाराचे घर फोडले; पावणेदोन लाखांचा ऐवज लांबविला

​लबाडीच्या इराद्याने घरातील वस्तू, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेवर डल्ला; नगर तालुका पोलिसांत गुन्हा...

आमदार काशिनाथ दाते यांनी मोठे यश; एक वर्षात काय काय केले…

पारनेरला ६० तर अहिल्यानगर तालुक्याला ९ कोटींचा निधी / | नवनागापूरमधील कार्यक्रमात एक वर्षांतील...

​अरणगावात चोरट्यांचा धुमाकूळ; काय घडलं पहा

​अहिल्यानगर /नगर सह्याद्री - नगर तालुक्यातील अरणगाव येथे एका शेतकऱ्याच्या गोठ्यावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत...

कोर्टात रक्तरंजित थरार! न्यायाधिशांसमोरच महिलेच्या डोक्यात कुऱ्हाड घातली, कुठे घडला प्रकार

कोल्हापूर / नगर सह्याद्री - कोर्टामध्ये सुनावणीदरम्यान न्यायाधिशांसमोच एका महिलेवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक...