spot_img
महाराष्ट्रकुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीचा कहर! थेट मंत्र्याच्या कार्यालयातील व्यक्तीला मारहाण; पुण्यात...

कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीचा कहर! थेट मंत्र्याच्या कार्यालयातील व्यक्तीला मारहाण; पुण्यात खळबळ

spot_img

पुणे / नगर सह्याद्री :
कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या टोळीकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील एका व्यक्तीस बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गजा मारणेच्या टोळीकडून थेट केंद्रीय राज्यमंत्र्याच्या कार्यालयातीलच व्यकीला मारहाण करण्यात इतपत आता मजल वाढल्याचे या घटनेवरून दिसत आहे. या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

या मारहाणीच्या घटनेत संबंधित व्यक्ती जखमी झाली आहे. ही धक्कादायक घटना शिवजयंतीच्या दिवशी घडल्याची माहिती मिळत आहे. मारहाण करणारे आरोपी नुकतेच जामिनावर बाहेर आले होते. ही मारहाणीची घटना हाँर्न वाजवत गाड्यांचा ताफा घेऊन जाताना वादातून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यामुळे पुण्यात कायदा सुव्यवस्था फक्त नावालाच आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.

या घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जखमी असलेल्या व्यक्तीची व्हिडिओ कॅालवर विचारपूस केली आहे. मारहाण करण्यात आलेली व्यक्ती मोहोळ यांच्या ऑफीसमध्ये सोशल मिडियाचे काम पाहते. मारहाणीमध्ये या व्यक्तीच्या नाकावर गंभीर स्वरुपाची इजा झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून मारणेचा भाचा फरार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण सातत्याने वाढताना दिसत आहे. पुणे पोलिसांकडून गुन्हेगारीला रोख लावण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. शहरात वाहन तोडाफोडीच्या घटना, चोरी, जबरी चोरी, मोबाईल हिसकावण्याचे प्रकार आदी घटना घडत आहेत. यातच कोयता गँगची दहशत अजूनही आहे. अशातच कुख्यात गुंड गजानन मारणेच्या टोळीकडून थेट केंद्रीय राज्यमंत्र्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘डबल’ परताव्याचे आमिष पडले महागात; नगरच्या ३ व्यावसायिकांना ७० लाखांना गंडवले!, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, श्रीगोंदा येथील...

जगताप-कोतकर कुटुंबात श्रद्धा- सबुरी हीच कर्डिलेंना श्रद्धांजली

सारिपाट / शिवाजी शिर्के प्रस्थापितांच्या विरोधात लढताना कधी थोरातांना तर कधी विखेंना घाम फोडणाऱ्या शिवाजीराव...

शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूनंतर जरांगेंही आक्रमक, आंदोलनकर्त्यांनी घेतला टोकाचा निर्णय; मुख्यमंत्री म्हणाले…

'कर्जमाफीचा निर्णय सरकार घेत नाही, तोपर्यंत...; बच्चू कडू अन् समर्थकांचं 'रेल रोको' आंदोलन, नागपूर /...

मंत्री विखे पाटील यांचे संगमनेर तालुक्‍यातील कार्यकर्त्‍यांना मोठे अवाहन; स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या निवडणूकीतही..

संगमनेर । नगर सहयाद्री:- आपल्‍या सर्वांच्‍या योगदानामुळे राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार सत्‍तेवर आले. लोकांसाठी...