अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
देशभरामध्ये महाशिवरात्री सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी ‘हर हर महादेवाचा’ जयघोष करत असताना आपल्याला अनोखी उर्जा मिळत असते, हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण असून आपल्याला लाभलेली परंपरा, संस्कृती अखंडितपणे पुढे चालू राहण्यासाठी आपले सण सर्वांनी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात साजरे करावे. या माध्यमातून पुढच्या पिढीला धार्मिकतेचे संस्कार मिळत असते, प्रत्येक नागरिकांनी धार्मिकता जोपासत महादेवाची आराधना केली पाहिजेत असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
भवानीनगर नागेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, योगेश खताळ, बाबा गाडळकर, राजू खताळ, विश्वास जोमीवाळे, विशाल मांडे, रामा ससाणे, नवनाथ मांडे, बंटी ससाणे, गणेश भदर, किरण मांदे, सनी करपे, रामेश्वर घोडके, मंगेश त्रिंबके, संतोष जयस्वाल आदी भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते
नागेश्वराचे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान
भवानीनगर येथील नागेश्वराचे मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असतात. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीपासूनच नागरिक महाआरती महाभिषेक करत असतात, नागेश्वर शिवभक्त मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले जाते अशी माहिती माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी व्यक्त केली.