Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकांचे बिगुल आज वाजणार आहे. कारण लोकसभा निवडणुकांच्यातारखा जाहीर होणार आहेत. शनिवारी दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत २०२४ च्या सार्वत्रिक (लोकसभा) निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
लोकसभेच्या निवडणुका कधी जाहीर होणार? असा प्रश्न सर्वांनाचं पडला असेल. पण अखेर प्रतीक्षा संपली आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. याकडं पत्रकार परिषदेकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. कारण, यामध्ये लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. काही राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या देखील जाहीर केल्या आहेत. त्यामुळं आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. भाजपने पुन्हा तिसऱ्यांदा आम्हीच सत्तेत येऊ असा दावा केलाय. तर यावेळी भाजपला पराभूत करु असा विश्वास विरोधकांनी व्यक्त केला आहे.