अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी फेरआरक्षण प्रक्रिया राबवली जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 1 हजार 223 ग्रामपंचायतींपैकी 915 सरपंचपदे 2025 ते 2030 या कालावधीसाठी आरक्षित करण्यात आली आहेत, तर 308 पदे खुल्या प्रवर्गासाठी ठेवण्यात आली आहेत.
यामध्ये 625 जागा महिलांसाठी राखीव असून, यामुळे ग्रामीण राजकारणात महिलांचा सहभाग लक्षणीय वाढणार आहे. बुधवारी (23 जुलै) 518 ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित झाले, तर उर्वरित ग्रामपंचायतींचे आरक्षण आज (24 जुलै ) जाहीर होणार आहे. या प्रक्रियेमुळे गावागावांत राजकीय चुरस वाढण्याची शक्यता आहे.
प्रांताधिकारी आणि तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बुधवारी अकोले (47), जामखेड (58), श्रीरामपूर (52), कोपरगाव (75), शेवगाव (94), श्रीगोंदे (87) आणि नगर (105) या सात तालुक्यांतील सरपंचपदांचे आरक्षण जाहीर झाले. आज (24 जुलै 2025) संगमनेर (144), राहाता (50), राहुरी (83), नेवासे (114), पारनेर (114), कर्जत (92) या तालुक्यांतील आरक्षण प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तहसीलदारांच्या देखरेखीखाली अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागास प्रवर्ग (OBC) यांच्यासाठी आरक्षण निश्चित झाले, तर प्रांताधिकाऱ्यांनी महिला सरपंचपदांचे आरक्षण निश्चित केले.
आरक्षणाचे वर्गवारीनुसार वाटपजिल्ह्यातील 915 आरक्षित सरपंचपदांचे तालुकानिहाय आणि प्रवर्गनिहाय वाटप खालीलप्रमाणे :
1. अनुसूचित जाती (SC) – 150 पदे (75 महिला)
अकोले: 4 (2 महिला)
संगमनेर: 11 (6 महिला)
जामखेड: 6 (3 महिला)
श्रीरामपूर: 13 (7 महिला)
शेवगाव: 10 (5 महिला)
कोपरगाव: 10 (5 महिला)
नगर: 15 (8 महिला)
राहुरी: 11 (6 महिला)
पाथर्डी: 8 (4 महिला)
पारनेर: 6 (3 महिला)
श्रीगोंदे: 12 (6 महिला)
राहाता: 15 (8 महिला)
नेवासे: 18 (9 महिला)
कर्जत: 11 (6 महिला)
2. अनुसूचित जमाती (ST) – 119 पदे (62 महिला)
अकोले: 12 (6 महिला)
संगमनेर: 24 (12 महिला)
जामखेड: 1 (1 महिला)
श्रीरामपूर: 8 (4 महिला)
शेवगाव: 2 (1 महिला)
कोपरगाव: 16 (8 महिला)
नगर: 5 (3 महिला)
राहुरी: 15 (8 महिला)
पाथर्डी: 2 (1 महिला)
पारनेर: 8 (4 महिला)
श्रीगोंदे: 6 (3 महिला)
राहाता: 9 (5 महिला)
नेवासे: 9 (5 महिला)
कर्जत: 2 (1 महिला)
3. नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – 330 पदे (169 महिला)
अकोले: 13 (7 महिला)
संगमनेर: 39 (20 महिला)
जामखेड: 16 (8 महिला)
श्रीरामपूर: 14 (7 महिला)
शेवगाव: 25 (13 महिला)
कोपरगाव: 20 (10 महिला)
नगर: 28 (14 महिला)
राहुरी: 22 (11 महिला)
पाथर्डी: 29 (15 महिला)
पारनेर: 31 (16 महिला)
श्रीगोंदे: 23 (12 महिला)
राहाता: 14 (7 महिला)
नेवासे: 31 (16 महिला)
कर्जत: 25 (13 महिला)
4. खुला प्रवर्ग – 624 पदे (316 महिला)
अकोले: 18 (9 महिला)
संगमनेर: 70 (35 महिला)
जामखेड: 35 (18 महिला)
श्रीरामपूर: 17 (9 महिला)
शेवगाव: 57 (29 महिला)
कोपरगाव: 29 (15 महिला)
नगर: 57 (29 महिला)
राहुरी: 35 (18 महिला)
पाथर्डी: 69 (35 महिला)
पारनेर: 69 (35 महिला)
श्रीगोंदे: 46 (23 महिला)
राहाता: 12 (6 महिला)
नेवासे: 56 (28 महिला)
कर्जत: 54 (27 महिला)
जामखेड तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींचे आरक्षण
अनुसूचित जाती (SC): 6 पदे (3 महिला – पाटोदा, हळगाव, धनेगाव; 3 पुरुष – दिघोळ, शिऊर, साकत)
अनुसूचित जमाती (ST) : 1 पद (1 महिला – पिंपरखेड)
नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC): 17 पदे (8 महिला – जवळा, झिक्री, बावी, मतेवाडी, वाकी, लोणी, देवदैठण, अरणगांव; 9 पुरुष – आनंदवाडी, कवडगाव, तेलंगशी, पिंपळगांव आळवा, बोर्ले, सातेफळ, डोणगाव, सारोळा)
सर्वसाधारण (खुला प्रवर्ग): 34 पदे (17 महिला – पाडळी, घोडेगांव, पिंपळगांव उंडा, नान्नज, सोनेगाव, जवळके, मोहा, बांधखडक, धानोरा, सावरगाव, आपटी, कुसडगांव, राजेवाडी, चोभेवाडी, गुरेवाडी, पोतेवाडी, वाघा, फक्राबाद; 17 पुरुष – आघी, खर्डा, खांडवी, खुरदैठण, चोंडी, जातेगाव, जायभायवाडी, तरडगाव, धामणगाव, धोंडपारगाव, नायगाव, बाळगव्हाण, मुंजेवाडी, मोहरी, रत्नापूर, राजुरी, नाहुली)
या आरक्षण सोडतीसाठी जामखेड तहसील कार्यालयात कर्जत विभागाचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार गणेश माळी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावर्षी सरपंचपदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने निवडणुका चुरशीच्या होण्याची शक्यता आहे.