spot_img
अहमदनगरसरपंच पदाच्या आरक्षणाचा फुगा फुटला; कही खुशी कही गम, 'या' ५४ ग्रामपंचायतींवर...

सरपंच पदाच्या आरक्षणाचा फुगा फुटला; कही खुशी कही गम, ‘या’ ५४ ग्रामपंचायतींवर ‘महिलाराज’

spot_img

पारनेरच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत जाहीर ; अनेकांना बसला धक्का! ग्रामपंचायत निवडणुकीत येणार रंगत

टाकळी ढोकेश्वर, आळकुटी खुल्या प्रवर्गासाठी; सुपा, हंगा महिलांसाठी राखीव

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री-
पारनेर तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज इंदिरा भवन सभागृहात तहसीलदार गायत्री सौंदणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण जाहीर झाले. टाकळी ढोकेश्वर, आळकुटी, गोरेगाव, कर्जुले हर्या, पिंपळगाव रोठा यांसारख्या मोठ्या ग्रामपंचायतींचे सरपंच पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. तर निघोज, भाळवणी यासारख्या ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी आणि सुपा, हंगा येथील सरपंच पदे महिला प्रवर्गासाठी राखीव ठरली आहेत.

या आरक्षणामुळे येणाऱ्या सहा महिन्यांत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. खुल्या प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार असून, अनुसूचित जमातीसाठी राखीव गावांमध्ये इतर प्रवर्गातील उमेदवारांमध्ये निराशा पसरली आहे. तहसील प्रशासनाने सर्व ग्रामसेवक आणि पदाधिकाऱ्यांना सोडत प्रक्रियेत सहभागी होण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण (2025-2030)

◆ अनुसूचित जाती (SC)
महिलांसाठी राखीवः पिंपळनेर, माळकुप, अस्तगाव

सर्वसाधारणः रांजणगाव मशिद, जामगाव, किन्ही

◆ अनुसूचित जमाती (ST)
महिलांसाठी राखीवः गुणोरे, भाळवणी, वडगाव आमली, म्हसणे

सर्वसाधारणः म्हसे खुर्द, निघोज, लोणीहवेली, म्हस्केवाडी

◆ नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)
महिलांसाठी राखीव :
राळेगण थेरपाळ, बाबुर्डी, भोंद्रे गारगुंडी, गारखिंडी, जाधववाडी, जातेगाव, जवळा, कारेगाव, कुरुंद, पाडळी रांजणगाव, पळशी, राळेगणसिध्दी, यादववाडी, पाबळ, काळकूप

सर्वसाधारण :
खडकवाडी, चोंभूत, पळवे बु., पठारवाडी, पुणेवाडी, रायतळे, वाघुंडे खु., विरोली, वनकुटे, सुपा, वाडेगव्हाण, पळवे खु., वडुले, शेरीकासारे, गटेवाडी

◆ सर्वसाधारण प्रवर्ग
महिलांसाठी राखीवः वडनेर हवेली, मांडवे खु., रांधे, घाणेगाव, मुंगशी, पिंप्री जलसेन, कासारे, पाडळी दर्या, पिंप्री गवळी, कडुस, म्हसोबा झाप, अक्कलवाडी, चिंचोली, वाघुंडे बु., वेसदरे, काकणेवाडी, रुईछत्रपती, ढोकी, सारोळा आडवाई, वडझिरे, शहांजापूर, वडनेर बु., डिकसळ, वडगाव सावताळ, पानोली, वारणवाडी, रेनवडी, पिंप्री पठार, काताळवेढा, कळस, तिखोल, दैठणे गुंजाळ, हिवरे कोरडा, हंगा, अपधूप

सर्वसाधारणः देविभोयरे, शिरापुर, टाकळी ढोकेश्वर, अळकुटी, बाभुळवाडे, भांडगाव, भोयरेगांगर्डा, दरोडी, देसवडे, ढवळपुरी, धोत्रे बु., गांजीभोयरे, गोरेगाव, हत्तलखिंडी, कान्हुर, करंदी, कर्जुलेहर्या, कोहोकडी, लोणीमावळा, मावळेवाडी, नांदुरपठार, नारायणगव्हाण, पाडळी कान्हुर, पळसपुर, पिंपळगावरोठा, पिंपळगावतुर्क, पोखरी, सांगवीसुर्या, सावरगाव, सिद्धेश्वरवाडी, वडगावदर्या, वाळवणे, वासुंदे, पाडळी आळे

नगर तालुक्यातील 105 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर
 सुनील चोभे | नगर सह्याद्री –
सन 2025- 2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी अहिल्यानगर तालुक्यातील 105 गावांची सरपंच पदाची आरक्षण सोडत बुधवारी (23 जुलै) जाहीर झाली. सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत सारोळा कासार, हिवरे बाजार, चिचोंडी पाटील, अकोळनेर, कामरगाव, पिंपळगाव माळवी ही गावे आरक्षित झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.

नगर तालुक्यातील सरपंच पद आरक्षण पुढील प्रमाणे
कायम ठेवण्यात आलेले आरक्षण- भोयरे खुर्द, पारेवाडी(पारगाव) अनुसूचित जाती स्त्री राखीव, बुरुडगाव- अनुसुचित जमाती स्त्री राखीव, पारगाव भातोडी – सर्वसाधारण, भोयरे पठार, मजले चिंचोली – सर्वसाधारण स्त्री, आव्हाडवाडी- सर्वसाधारण.

अनुसुचित जातीसाठी राखीव
अकोळनेर-जाधववाडी, पांगरमल, कामरगाव, भोरवाडी, सांडवे, मांडवे (अनुसुचित जाती स्त्री राखीव), टाकळी खातगाव, सारोळा कासार, आठवड, हिवरे बाजार, वारुळवाडी, धनगरवाडी, चिचोंडी पाटील (अनुसुचित जाती व्यक्ती)

अनुसुचित जमातीसाठी राखीव
खातगाव टाकळी, जेऊर (अनुसुचित जमाती स्त्री राखीव), पिंपळगाव माळवी, देहरे (अनुसुचित जमाती व्यक्ती).

नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी राखीव
इमामपूर, शहारपूर केकती, शिराढोण, हातवळण, मठपिंप्री, अरणगाव, हमीदपूर, पारगाव मौला, पिंप्री घुमट, वाळूंज, खडकी, उदरमल, निंबळक, नागरदेवळे (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव), रांजणी, रुईछत्तीसी, गुंडेगाव, इसळक, मांजरसुंबा, बहिरवाडी, पिंळगाव कौडा, मेहकरी, देऊळगाव सिद्धी, नारायणडोह, डोंगरगण, हिंगणगाव, ससेवाडी, नांदगाव व कोळपे आखाडा (नागरिकांचा मागास प्रवर्ग).

सर्वसाधारण प्रवर्गसाठी राखीव
शिंगवे व इस्लामपूर, विळद, पोखड, बुऱ्हाणनगर, जखणगाव, सोनेवाडी, चास, दशमी गव्हाण, सोनेवाडी (पिला), खांडके, माथणी व बाळेवाडी, वाळकी, नवनागापूर, घोसपुरी, टाकळी काझी, मदडगाव, हिवरे झरे, साकत खुर्द, वडगाव तांदळी, गुणवडी, वाटेफळ, तांदळी वडगाव, आंबीलवाडी, खोसपुरी, कर्जुने खारे, खंडाळा (सर्वसाधारण स्त्री), कोल्हेवाडी (सर्वसाधारण स्त्री राखीव), निमगाव घाणा, पिंपळगाव उज्जैणी, शेंडी, कापूरवाडी, निमगाव वाघा, पिंपळगाव वाघा, दरेवाडी, वाकोडी, निंबोडी, वडारवाडी, बाराबाभळी, भातोडी पारगाव, कौंडगाव व जांब, पिंळगाव लांडगा, बाबुड घुमट, आगडगाव, रतडगाव, देवगाव, वडगाव गुप्ता, बाबुड बेंद, उक्कडगाव, दहीगाव, राळेगण, नेप्ती, सारोळा बध्दी, बारदरी (सर्वसाधारण व्यक्ती).

सन 2025- 2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार नगर तालुक्यातील 105 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार संजय शिंदे अध्यक्षतेखाली काढण्यात आली. तर प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला आरक्षण सोडत काढण्यात आली.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीपूव सरपंच आणि उपसरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले जाते. त्यानंतर ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणुका घेतल्या जातात. दोन महिन्यांपूव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले होते. त्यावेळी सुटलेल्या आरक्षणानंतर अनेकांचा हिरमोडही झाला होता. काही जणांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुन्हा सरपंच पद आरक्षण सोडत काढण्यात आली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत जाहीर ; अनेकांना बसला धक्का! ग्रामपंचायत निवडणुकीत येणार रंगत!

  टाकळी ढोकेश्वर, आळकुटी खुल्या प्रवर्गासाठी; सुपा, हंगा महिलांसाठी राखीव पारनेर | नगर सह्याद्री- पारनेर तालुक्यातील 2025...

‘मारी’ साथीदारासह अडकला जाळ्यात; अंगठ्या, झुबे, डोरल्यासह ‘इतके’ दागिने गवसले..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- तोफखाना पोलीसांनी घरफोडीच्या दोन गुन्ह्यांमध्ये 8 लाख 76 हजार रुपये किमतीचे...

विनापरवाना फलक लावणाऱ्यांना आयुक्त यशवंत डांगे यांचा इशारा; ‘आता…’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिका क्षेत्रात परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात बॅनर, फलक, मोठे जाहिरात...

गोठा पेटवणाऱ्या मदारींना हद्दपार करा; निघोजकर झाले आक्रमक, वाचा प्रकरण..

निघोज ग्रामसभेत ठराव ; १५ ऑगस्टला रस्ता रोकोचा इशारा निघोज । नगर सहयाद्री:- निघोज येथील...