विटंबने नंतर आ.जगताप यांच्या हस्ते सारोळा कासार येथील हनुमान मंदिरात महाआरती
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
जिहादी लोक संपूर्ण देशभरात हिंदू समाज बांधवांच्या भावना दुखावतील अशा घटना जाणीवपूर्वक घडवून आणत आहेत. त्यामुळे हिंदूमाजाने आता जागरुक झाले पाहिजे, एकजूट दाखविली पाहिजे तरच या घटना थांबतील नाहीतर भविष्यात हे लोक आपल्या घरापर्यंत आल्या शिवाय राहणार नाहीत. त्यांचा छुपा अजेंडा आपण समजून घेतला पाहिजे. आजपर्यंत झाला तेवढा भाईचारा खूप झाला. या पुढे यांच्या पासून सावध राहत यांच्या नांग्या जाग्यावरच ठेचण्याची वेळ आली आहे. तरुण वर्ग आता जागा होत आहे. त्यामुळे वयोवृद्धांनी त्यांच्या सोबत जाता येत नसले तरी त्यांना धर्म कार्यासाठी आडकाठी न घालता संमती द्यायला हवी. असे आवाहन हिंदूधर्मरक्षक आमदार संग्राम जगताप यांनी केले.
घटस्थापनेच्या दिवशी अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा कासार येथे हनुमान मंदिरात झालेल्या विटंबनेनंतर आ. संग्राम जगताप यांनी 3 ऑक्टोबर रोजी सकाळी गावात भेट देत हनुमान मंदिरात महाआरती केली. यावेळी गावातील हिंदू समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या घटनेचा तपास पोलिसांनी तातडीने लावून आरोपींना अटक करावी. हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर भविष्यात याचा आणखी उद्रेक होईल. असा इशाराही आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्याख्याती प्रणाली कडूस हिने केले. माजी सरपंच रविंद्र कडूस यांनी यावेळी घटनेचा घटनाक्रम सांगितला. तर संजय काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी नगर बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष घिगे, माजी उपसभापती रेवणनाथ चोभे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.