spot_img
ब्रेकिंग‘किडलेल्या व्यवस्थेला बायपास सर्जरीची गरज’ रोहित पवारांचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल

‘किडलेल्या व्यवस्थेला बायपास सर्जरीची गरज’ रोहित पवारांचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल

spot_img

पुणे। नगर सहयाद्री-
पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणी वेगवेगळ्या प्रकारच्या अपडेट समोर येत आहे. त्यातच आता पोर्शे कार अपघातावरून रोहित पवार पुन्हा आक्रमक झाले आहे. या अपघातावरून त्यांनी ट्विटर अकाउंटवर पोस्ट करत सरकारवर जहरी टीका केली आहे. किडलेल्या व्यवस्थेला बायपास सर्जरीची गरज असल्याची पोस्ट करत त्यांनी सरकारच्या व्यवस्थेवर हल्लाबोल केला आहे.

कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल, वडील विशाल अग्रवाल यांच्यानंतर आई शिवाणी अग्रवाल यांना देखील अटक करण्यात आली आहे. पुणे हिट अँड रनप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे किडलेल्या व्यवस्थेच पितळ उघड पडलं आहे. पोलीस विभागातील अधिकाऱ्यांचे, डॉक्टरांचे कारनामे देखील उघडकीस आले असून आरटीओ आणि एक्साईज विभागावर देखील त्यांनी निशाणा साधला आहे.

आमदार रोहित पवार यांच्या ट्विटमध्ये नेमकं काय?
कल्याणीनगरमध्ये दोन निष्पापांना गाडीखाली चिरडल्यानंतर किडलेल्या संपूर्ण यंत्रणेचंच पितळ उघड पडलं आहे. पोलिस विभागातील अधिकाऱ्यांचे कारनामे उघडकीस आले, डॉक्टरांनी हात धुवून घेतले, RTO ने डोळे मिटून दूध पिलं तर एक्साईज विभाग नशेत असल्याचं दिसून आलं आहे.

बाल न्याय मंडळानेही ‘निबंध’ लिहायला सांगून दोघांचा बळी घेणाऱ्या आरोपीला एका दिवसात मोकळं सोडलं. एरवी रस्त्यावरच्या भाजीवाल्याकडूनही दंड वसूल करणाऱ्या महापालिकेलाही मग जाग आली आणि त्यांनी घाऊक स्वरुपात हॉटेलांवर कारवाई करुन हातावर पोट असलेल्या अनेक सामान्य कामगारांच्या नोकऱ्यांचा घोट घेतला.

हे संपूर्ण व्यवस्था सडल्याचंच लक्षण आहे. म्हणून सामान्य लोकांनाच दबाव आणून या किडलेल्या व्यवस्थेवरच बायपास सर्जरी करावी लागणार आहे. नाहीतरी आज त्या दोन मृतांना न्याय मिळण्याची जी काही शक्यता निर्माण झालीय तीही केवळ सामान्य लोकांच्या दबावामुळेच, हे विसरता येणार नाही. असं म्हंटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...