Accident News: पुण्याहून रायगडच्या दिशेने येणाऱ्या खाजगी बसला ताम्हणी घाटात अपघात झाला. चालकाच्या वाहनावरील ताबा सुटल्याने बस उलटली यात पाच जण दगावल्याची प्राथमिक माहिती आहे.
लग्नाचे वऱ्हाड घेऊन बस महाडच्या दिशेने येत होती त्यामुळे घाटात एका तीव्र वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि बस कडेला जाऊन उलटली. या अपघातात पाच जण बस खाली चिरडले गेले त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. २५ जण जखमी झाले आहेत. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.
मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुष यांचा समवेश आहे. संगीता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदीप पवार, वंदना जाधव अशी मृतांची नावे आहे. एका मृतांची ओळख पटलेली नाही अशी माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथके घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मदत व बचाव कार्याला सुरुवात केली आहे. बसमधील जखमी व्यक्तींना माणगाव येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.