spot_img
अहमदनगरप्रियसीला संपवणारा प्रियकर गजाआड! नगरमधील 'नाजूक' प्रकरण

प्रियसीला संपवणारा प्रियकर गजाआड! नगरमधील ‘नाजूक’ प्रकरण

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
केडगाव देवी मंदिर परिसरात एका महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना सोमवारी घडली होती. दरम्यान, खून करणारा व्यक्ती तिचा प्रियकर असल्याची माहिती उजेडात आली होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी कर्जत येथून बुधवारी सायंकाळी प्रियकर सारस दत्तु सुरवसे (वय 29 रा. माळीगल्ली, गोदड महाराज मंदिराजवळ, कर्जत) याला ताब्यात घेतले आहे. संगीता नितीन जाधव (वय 35 मुळ रा. पारगाव खंडाळा, ता. खंडाळा, जि. सातारा, हल्ली रा. मोहिनीनगर, केडगाव, अहिल्यानगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

केडगावमधील मोहिनीनगर येथे सोमवारी (24 फेब्रुवारी) रात्री ही घटना घडली होती. संगीता जाधव या त्यांच्या बहिणीकडे केडगाव येथील घरी आल्या होत्या. प्रियकर सारस सुरवसे देखील सोबत होता. मात्र, काही महिन्यांपासून सारस हा संगिताच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार वाद घालत होता. रात्री जेवण झाल्यानंतर ते दोघे बहिणीच्या घरातील रूममध्ये झोपण्यासाठी गेले. त्या ठिकाणीच प्रियकर सारसने संगीता यांचा कापडाने गळा आवळला. संगीता याचा ओरडण्याचा आवाज येताच त्यांची बहिण व इतर नातेवाईकांनी रूमकडे धाव घेतली. संगीता बेशुध्द अवस्थेत होत्या.

घटनेची माहिती मिळताच तातडीने रूग्णवाहिका आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी संगिताला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला व सारसचा शोध सुरू केला. तो बुधवारी कर्जत येथे असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. त्यांनी त्याला ताब्यात घेत अटक केली आहे. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे अधिक तपास करत आहेत

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...