spot_img
अहमदनगर'बोंबाबोंब' आंदोलनाने पंचायत समिती दणाणली; मागण्या काय? वाचा..

‘बोंबाबोंब’ आंदोलनाने पंचायत समिती दणाणली; मागण्या काय? वाचा..

spot_img

सुपा |  नगर सह्याद्री:-
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना ४५११ पारनेर संघटनेच्या वतीने पारनेर पंचायत समिती वर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाच्या स्थानिक समस्या विषय बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने पारनेर पंचायत समिती कार्यालय दणाणून निघाले. यावेळी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या अधिकार्यांसमोर मांडल्या यात गुन्ह्यात शासकीय पंच म्हणून नियुक्ती करू नये, घंटागाडी वर अतिरिक्त कर्मचारी नेमणुक करावी, ग्रामपंचायत कर्मचार्यांना थकीत राहणीमान भत्ता मिळावा, भविष्य निर्वाह निधी ग्रामपंचायत हिस्सा कर्मचारी खात्यावर जमा करावा, २५ टक्के, ५० टक्के किमान वेतनाचा फरक मिळावा, अपुर्ण सेवा पुस्तक अद्यावत करावे, पाणी पुरवठा कर्मचारी बांधवास सुरक्षा साहित्य पुरविणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विमा उतरविणे, शासकीय परिपत्रकाची अंमलबजावणी न करणार्या विस्तार अधिकारी व ग्रामसेवकांना वर कारवाई करावी आदी विविध मागण्या मान्य करुन घेण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

दोलनाचे नेतृत्व जिल्हा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डिके व जिल्हा सचीव आत्माराम घुणे यांने केले. माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवती महिला अध्यक्ष पुनमताई नाना मुंगसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष सतिश मस्के, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका सचीव नारायणराव नरवडे, संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश ईधाटे, जवळा ग्रामपंचायतीचे मा सरपंच सुहास आढावा, संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य त्रिंबक पाचर्णे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रामभाऊ गव्हाणे आदी मान्यवरांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दयानंद पवार यांनी संघटनेला दिवाळी पुर्वी तुमच्या सर्व मागण्या मान्य करण्यात येतील असे आश्वासन दिले. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी, तालुका अध्यक्ष शब्बीर भाई शेख, तालुका सचीव लक्ष्मीकांत आल्हाट, तालुका उपाध्यक्ष सचीन केदार, उपाध्यक्ष सुरेश बेलकर, किरण शिंदे, अशोक दिवटे, दयानंद खेनट व तालुका मार्गदर्शक शशिकांत साळवे व कर्मचारी बांधवांनी परिश्रम घेतले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम ‘या’ दिवशी जाहीर होणार?

माय नगर वेब टीम Zilla Parishad Panchayat Samiti Election : येत्या २ डिसेंबर २०२५...

बीड पुन्हा हादरलं; ४ जणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं

बीड / नगर सह्याद्री - बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथे शेतीच्या वादातून चार जणांना...

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव, नेमकं काय केल?

नगर सह्याद्री वेब टीम Sonakshi Sinha : बॉलिवूडची फिटनेस क्वीन अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज अभिनय,...

नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री...