spot_img
अहमदनगरनालेगावच्या तरुणाचा सापडला मृतदेह! हत्या की आत्महत्या?

नालेगावच्या तरुणाचा सापडला मृतदेह! हत्या की आत्महत्या?

spot_img

पारनेर । नगर सह्याद्री:-
तालुक्यातील हिवरे कोरडा येथे एका तरुणाने विहिरीमध्ये उडी मारून जीवन यात्रा संपवल्याची घटना घडली आहे. अमोल राजू जाधव ( वय २७ वर्ष, नालेगाव,अहमदनगर ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

या आत्महत्येमागेचे कारण अद्याप पर्यंत स्पष्ट झाले नसून पारनेर पोलिसांकडून तपास चालू आहे. या आत्महत्येमुळे काही काळ मांजरधाव वस्ती परिसरात खळबळ उडाली होती. अहमदनगर शहरातील नालेगाव परिसरातील अमोल जाधव सोमवारी दि. २६ ऑगस्ट पासून बेपत्ता होते.

गुरुवार दि. १९ ऑगस्ट रोजी हिवरे कोरडा परिसरातील मांजरधाव वस्ती वर जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला स्कूटर गाडी लावून गंगाधर अडसुळ यांच्या शेतातील विहिरीमध्ये आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी पाकीट, चष्मा, चप्पल देखील आढळून आली.

घटनेची माहिती मिळताच पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मानसिंग शेलार, पोलीस कॉन्स्टेबल सतीश बर्डे, पोलीस कॉन्स्टेबल सारंग वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरबद्दल धक्कादायक माहिती समोर, ‘त्या’ घटनेस…

न्यायालयीन चौकशीचा अहवाल समोर मुंबई / नगर सह्याद्री - बदलापुरातील दोन शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचार...

महायुतीत बिनसलं! एकनाथ शिंदे, अजित पवार आता भाजपचे नेते नाराज; काय आहे नेमकं कारण?

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून ते आतापर्यंत महायुतीत सर्व...

‘शिंदेना संपवणार, नवीन उदय होणार, विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - 'शिंदेना संपवणार, नवीन उदय होणार', असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे...

महापालिकेत पाळीव प्राण्यांची नोंद करणे बंधनकारक; आयुक्तांनी केले असे आवाहन…

जुन्या मनपा कार्यालयातील आरोग्य विभागात अर्ज उपलब्ध / नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या पाळीव प्राण्यांची नोंद...