अहमदनगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मुंढेकरवाडी येथील महिलेचा मृतदेह साताऱ्यामधील कोरेगाव येथील एका कालव्यात आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली होती. घटनेनंतर पाच ते सहा दिवसांतच पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले आहे.
पोलिस तपासात या महिलेचा खून तिचा गावातील प्रियकर राजेंद्र जगन्नाथ देशमुख ( रा. मुंढेकरवाडी, ता श्रीगोंदा, अहमदनगर ) आणि साथीदार बिभीषण चव्हाण ( रा. बाभूळगाव ता. इंदापूर ) यांनी करून कालव्यात फेकून दिला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
अधिक महिती अशी :राजेंद्र देशमुख याचे गेल्या पाच महिन्यांपासून सदर महिलेशी प्रेमसंबंध होते. सदर महिला राजेंद्र याला सोबत राहण्याचा हट्ट करत होती. त्यामुळे राजेंद्र याने बिभीषण चव्हाण याच्या मदतीने तिचा खून करण्याचा कट रचला.
त्यामुळे राजेंद्र याने बिभीषण चव्हाण याच्या मदतीने तिचा खून करण्याचा कट रचला. २९ मे रोजी हे दोघे तिला सातारा परिसरात घेऊन गेले. तेथे त्यांची पुन्हा वादावादी झाली त्यानंतर त्यांनी तिचा गळा आवळून खून केला. तसेच खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी नजीकच्या कालव्यात मृतदेह फेकून दिला होता.
घटनेनंतर पाच ते सहा दिवसांत पोलीस घटनेचा तपास करत होते. मृत सुभद्राच्या गळ्यात श्रीगोंदा येथील सराफाचा शिक्का असलेले मंगळसूत्र पोलिसांच्या हाती लागले. मंगळसुत्रावरील शिक्का पाहून सातारा पोलिसांनी श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर सदर प्रकरण उघडकीस आले.
त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित आरोपी राजेंद्र जगनाथ देशमुख, बिभीषण सुरेश चव्हाण यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गळा आवळून खून केल्याची कबुली दिली.
‘साताऱ्या’ मध्ये आढलेल्या महिलेच्या मृतदेहाला ‘अहमदनगर’ ची किनार!
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात एक महिला घरात काहीही न सांगता निघून गेली अल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासात करत असतानाच कोरेगाव (सातारा) येथील कालव्यात महिलेचा मृतदेह सापडला असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व हातातील अंगठी नातेवाईकांना दाखवण्यात आली. सदर वस्तू या सुभद्रा मुंढेकर यांच्याच असल्याचे समोर आले. या वस्तूवरून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली.