spot_img
अहमदनगरवाढदिवसाची पार्टी मजुराच्या जीवावर बेतली! 'त्या' महामार्गावर नेमकं घडलं काय? पहा..

वाढदिवसाची पार्टी मजुराच्या जीवावर बेतली! ‘त्या’ महामार्गावर नेमकं घडलं काय? पहा..

spot_img

निघोज । नगर सहयाद्री
कवठे यमाई तालुका शिरूर येथे एका मित्रांच्या वाढदिवसाची पार्टी करून धाब्यावरून उलट्या दिशेने येणाऱ्या चार चाकी गाडीने धडक दिल्याने एका निष्पाप तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाल्यांची घटना घडली आहे.

कवठे यमाई येथे अष्टविनायक महामार्गावर एका धाब्याच्या जवळ हा अपघात बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास झाला. फिर्यादी अमोल गोरक्ष येठेकर ( (वय 34 वर्षे, व्यवसाय शेती, रा.गुंडेगाव, ता. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली असून दिपक जालिंदर येठेकर (वय ३३ वर्षे,रा. गुंदेगाव) यांचा मृत्यु झाला आहे.

अधिक माहिती अशी: कवठे येमा-पारगाव रस्त्यावर फिर्यादी यांचा चुलत भाऊ दिपक येठेक आणि रंगनाथ आढाव हे दोघे दुचाकी ( क्र, एम. एच. 16. सी. आर.7785 ) घेऊन जेवणाचा डब्बा आणण्या करीता गेला असता विरोध दिशेने येणाऱ्या भरधाव इको कार ( क्र, एम.एच.12.टी.डी.8718 ) ने मोटार सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दिपक येठेकर याचा मृत्यू झाला असून रंगनाथ आढाव गंभिर जखमी झाले आहे.

वाढदिवसाची पार्टी मजुराच्या जीवावर बेतली
चार चाकी गाडी चालविणारे तरुण हे एका मित्रांच्या वाढदिवसाची पार्टी असल्यांने धाब्यावर मद्य सेवन करीत फार्महाऊस वर बकऱ्यावर ताव मारायला निघाल्याची चर्चा परीसरात आहे. त्यामुळे वाढदिवसाची पार्टी मात्र एका गरीब मजुराच्या जीवावर बेतली असुन गाडी चालक पसार झाला आहे. गाडीचा मालक कोण ? चालक कोण ? याचा तपास करून आरोपीला गजाआड करण्याची मागणी नागरीकाकडून केली जात आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! रस्त्यावर कचरा टाकणे आता पडणार महागात

मनपा दंडात्मक कारवाई करेल ः आमदार संग्राम जगताप | पाईपलाईन रोड परिसरामध्ये राबवले स्वच्छता...

जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण, नगरमध्ये घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मागील जेवणाचे बिल मागितल्याचा रागातून एका ग्राहकाने हॉटेल चालकावर लोखंडी रॉडने...

अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; कसे आहे नियोजन, वाचा सविस्तर

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना...

२२ कोटींच्या फायद्याचे आमिष दाखवून प्राध्यापकाला ३ कोटी ३ लाखांचा गंडा

तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री भाग बाजारामध्ये भरघोस परताव्याचे आमिष...