spot_img
ब्रेकिंगसर्वात मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या याचिकेवर 'या' तारखेला सुप्रीम निर्णय होणार...

सर्वात मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या याचिकेवर ‘या’ तारखेला सुप्रीम निर्णय होणार…

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ११ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. या याचिकेवर अंतिम निर्णय याच दिवशी येण्याची शक्यता असल्यामुळे मराठा समाज आणि राज्य सरकार यांचे याकडे लक्ष लागून आहे.

मराठा आरक्षणासंबंधी न्यायालयीन लढाईमध्ये राज्य सरकारला याआधी अपयश आले होते, तरीही राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करत सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला. ही याचिका आता सुप्रीम कोर्टात अंतिम टप्प्यावर असल्याची माहिती समोर येत आहे.

मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर आता पुन्हा सुनावणी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर ११ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या याचिकेवर येत्या ११ सप्टेंबरला अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे.मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

विनोद पाटील यांनीच सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर आता ११ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणावर अंतिम निर्णय येणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.राज्याचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.

मराठा समाज अनेक वर्षांपासून न्यायाची वाट पाहत आहे. तर समाजाला कुणबी मराठा म्हणून मान्यता मिळेल अशी अपेक्षा होती. त्यामुळे 11 तारखेला होणारी सुनावणी न्याय मिळण्याची अंतिम संधी मानली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर आता याबाबतची जबाबदारी आहे, त्याचं कारण म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी काय काय केलं, तसेच मराठा समाजाला न्याय देण्यासाठी देखील ते प्रयत्न करतील अशी अपेक्षा.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कुकडीचे आवर्तन तातडीने सोडा; कोणी केली मागणी पहा…

माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र म्हस्के यांचे उपोषण सुरू श्रीगोंदा | नगर सह्याद्री कुकडीच्या सल्लागार समितीची...

कर्जत नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, आता काय घडलं पहा

उच्च न्यायालयाकडून कारणे दाखवा नोटीस , गटनेता बदलण्याचा प्रस्ताव पुन्हा कोर्टात कर्जत | नगर सह्याद्री कर्जत...

जिल्ह्यात अवैध धंद्यांवर संक्रात; इतक्या ठिकाणी रेड, पहा सविस्तर

विविध ३३ गुन्ह्यांत पाच लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्हा पोलीस अधीक्षक...

संगमनेरचे राजकीय वातावरण बिघडले; थोरातांचा मंत्री विखेंवर निशाणा, काय म्हणाले पहा

संगमनेर | नगर सह्याद्री तालुक्यात सध्या राजकीय वातावरणात घडत असलेल्या बदलांमुळे एक प्रकारची दहशतीची भावना...