spot_img
ब्रेकिंगसर्वात मोठी कारवाई ! 33 खासदारांना केले निलंबित

सर्वात मोठी कारवाई ! 33 खासदारांना केले निलंबित

spot_img

नवी दिल्ली / नगरसह्याद्री : लोकसभा अध्यक्षांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे. लोकसभेतील एकूण 33 खासदारांना निलंबित केलं आहे. लोकसभेत कामकाज सुरू असताना गोंधळ घातल्याने ही कारवाई करण्यात आली.

यातील अनेक खासदारांना संपूर्ण अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केलं आहे. विरोधी पक्ष संसदेच्या सुरक्षेबाबतच्या आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर या सर्व 31 खासदारांना निलंबित केले गेले.

या आधी दोनच दिवसांपूर्वी विरोधी पक्षांच्या 13 खासदारांना निलंबित केले आहे. लोकसभा अध्यक्षांचं विरोधी पक्षाचे खासदार ऐकतच नव्हते. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांना कठोर पाऊल उचलावं लागलं आहे. लोकसभेत झालेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले होते.

विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. काही खासदार तर वेलमध्ये येऊन गोंधळ घालत होते. या सर्व खासदारांना संसदेच्या विशेष अवधीसाठी निलंबित करण्यात आलं आहे. कल्याण बॅनर्जी, ए राजा, दयानिधी मारन, अपरुप पोदार, प्रसून बॅनर्जी, ईटी मोहम्मद बशीर, जी सेल्वल्म, अन्नादुरई, टी सुमति, अधीर रंजन चौधरी,

रवीस्वामी प्रेम चंद्रन, शताब्दी रॉय, सौगत रॉय, असीथ कुमार, कौशल कुमार, एंटो एंटोनी, पल्ली मणिकम, प्रतिभा मंडल, काकोली घोष, सुनील मंडल, के मुरलधरन आणि अमर सिंह आदी खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. आता पर्यंत निलंबित खासदारांची संख्या 47 झाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...