spot_img
अहमदनगरअजितदादांना धक्का? 'बड्या' नेत्याने दिला राजीनामा! शरद पवार यांचे केले 'स्वागत'

अजितदादांना धक्का? ‘बड्या’ नेत्याने दिला राजीनामा! शरद पवार यांचे केले ‘स्वागत’

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेने नगर जिल्ह्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. याच दरम्यान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी अचानकपणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

बाळासाहेब नाहाटा मागील सहा महिन्यांपासून ते जिल्हाध्यक्षपदाचे काम पाहत होते. लोकसभा निवडणूक काळात ५ हजार समर्थकांचा मेळावा त्यांनी नगरमध्ये घेतला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला.

त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पाठवला आहे. यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक प्रकारे धक्काच बसला असून राजकीय चर्चाना उधाण आले असून

एकाच वेळी एवढ्या पदांवर काम करणे अशक्य
मी राज्य बाजार समितीचा सभापती आहे व राज्यातील ३२२ बाजार समिती विकासासंदर्भात काम करतो. याशिवाय कृषी आणि पणन मंडळावरही मी संचालक आहे. नगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षपद असताना धुळे जिल्हा निरीक्षक पदाची जबाबदारी पक्षाने दिली. एकाच वेळी एवढ्या पदांवर काम करणे अशक्य आहे. तसेच महायुतीत कोणत्याही पक्षाला श्रीगोंद्याची उमेदवारी गेली तरी पक्षाचा प्रोटोकॉल पाळून आम्ही मदत करणार आहोत.
– बाळासाहेब नाहाटा

‘बाळासाहेब नाहाटांकडून शरद पवार यांचे स्वागत’
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार श्रीगोंदा दौर्‍यानिमित्त आले असता महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय येथे विविध भूमिपूजन व उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्या हस्ते पवार यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आमदार राहुल जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मंत्री आदिती तटकरेंची महत्त्वाची माहिती; लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता..

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे. लाडकी बहीण...

सरपंच देशमुख हत्या प्रकरण: मनोज जरांगे संतापले, म्हणाले, जनतेने तपास हातात घेतला तर सरकारला..

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उद्या परभणी जिल्हा दौऱ्यावर आहेत....

अहिल्यानगर: ‘गोड’ ऊसाच्या शेतात आंबट कारभार? पोलिसांचा छापा, पुढे घडलं असं काही..

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील काष्टी गावाजवळ सुरू असलेला गावठी दारूचा अड्डा श्रीगोंदा पोलिसांनी उद्ध्वस्त...

कार्यकर्त्यांनो झेडपी, मनपाच्या तयारीला लागा; निवडणुकांचा बार उडणार

मुख्यमंत्र्यांच्या विधानाने इच्छुक सरसावले | तीन महिन्यांत झेडपी, मनपा निवडणुकांचा बार सुनील चोभे / नगर...