अहमदनगर / नगर सह्याद्री : शरद पवार गटाचे जयंत पाटील हे आज अहमदनगर मध्ये आहेत. त्यांनी कर्जतमध्ये विजय निश्चिती मेळावा व अहमदनगरमध्ये बैठक घेतली.
त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात मराठी माणसांनी निर्माण केलेले दोन पक्ष फोडले गेले, आमदारांना बाजूला करायचे काम झालं. स्वतः च्या ताकदीवर पक्ष काढायचा याची चर्चा झाली नाही. मात्र सरकार यंत्रणानी पक्ष फोडण्यास मदत केली.
भारतीय लोकशाहीची घंटा वाजायला सुरवात झाली आहे असा घणाघात जयंत पाटील यांनी केला. दरम्यान त्यांनी आ. रोहित पवार यांचेही कौतुक केले. रोहित पवारांनी विशेष लक्ष घालून काम केलं असं म्हटलं आहे. तसेच आपल्याला पवार साहेबांना साजेसं नाव पक्षाला मिळेल असेही ते म्हणाले.
दरम्यान आरक्षणाबाबत मुद्य्यांना त्यांनी हात घातला. ते म्हणाले, मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. ओबीसी आरक्षणावर कोणी बोलत नाही. धनगर आरक्षणच काय झालं? सामाजिक अस्थिरता निर्माण झालीये. या सर्व गोष्टीला सरकारचा पाठिंबा आहे. असं चित्र आम्ही 40 वर्षांत पहिलेलं नाही, असं जयंत पाटील म्हणाले.