spot_img
अहमदनगर‘बहीण माझी लाडकी’ योजना कागदपत्रांमुळे ठरतेय अडचणीची; महिलांच्या तलाठी कार्यालयाबाहेर रांगा

‘बहीण माझी लाडकी’ योजना कागदपत्रांमुळे ठरतेय अडचणीची; महिलांच्या तलाठी कार्यालयाबाहेर रांगा

spot_img

महिलांच्या तलाठी कार्यालयाबाहेर रांगा
अहमदनगर | नगर सह्याद्री
राज्य सरकारने घोषित केलेली बहिण माझी लाडकी योजनेला विविध शासकीय कागदपत्रे गोळा करणे नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. पात्र असणार्‍या महिलांना डोमेसाईल (रहिवासी प्रमाणपत्र) आवश्यक असून हे प्रमाणपत्र काढतांना विवाहित महिलांचे नावात बदल झालेला असल्याने त्यांनी कोणत्या नावाने दाखला काढावा, यासह योजना राबवणारे महिला बालकल्याण विभाग तो ग्राह धरणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच जन्माचा दाखला- शाळा सोडल्याचा दाखला नसणार्‍या महिलांना रहिवासी प्रमाण कसे मिळणार याबाबत अनेक अडचणी समोर येत आहे. दरम्यान उत्पन्न व रहिवासी दाखला मिळविण्यासाठी अनेक नगर शहरातील नालेगाव, माळीवाडा, सावेडी, केडगावसह तलाठी कार्यालयाबाहेर महिलांच्या रंगा लागल्याचे चित्र आहे

बहिण माझी लाडकी योजना राबवण्यासाठी महिला बालकल्याण विभागाची राज्य पातळीवर आणि जिल्हा पातळीवर ऑनलाईन बैठक होणार असून या बैठकीत योजना राबवत असतांना येणार्‍या शासकीय दाखल्यांची अडचण मांडण्याची मागणी होत आहे. त्यावर राज्य पातळीवरून तातडीने धोरणात्मक निर्णय होवून मार्ग काढण्याची मागणी जिल्हाभरातील महिला आणि सेतू चालकांकडून होत आहे. शिंदे सरकारने महिलांना महिन्यांला दीड हजार रुपये आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री बहिण माझी लाडकी योजनेची घोषणा केली आहे. यासाराज्यातील २१ ते ६० वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. योजनेत पात्र होण्यासाठी असणार्‍या अटीमध्ये लाभार्थी महिला ही राज्यात जन्मलेली आणि राहणारी असल्याचा तहसीलदार यांचा दाखला (डोमोसाईल) सक्तीचे करण्यात आले आहे.

मात्र, या डोमोसाईल प्रमाणपत्रासाठी संबंधीत महिलांना शाळा सोडल्याचा अथवा जन्माचा दाखला आवश्यक आहे. हे दाखल असणार्‍या महिलांचे नाव विवाहानंतर बदलेले आहे. यामुळे त्यांचा हे प्रमाणपत्र नवीन नावाने निघणार आहेत. अशा परिस्थितीत ते प्रमाणपत्र स्विकरले जाणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तसेच ज्या महिलेकडे जन्म दाखला असेल तर डोमेसाईल काढण्याची गरज राहणार नाही. जिल्ह्यात बहुतांश महिलेकडे जन्म दाखला आणि शाळा सोडल्याचा दाखले अशा महिलांसह अशिक्षित असणार्‍या महिला या योजनेला पात्र असतांना केवळ दाखले नाहीत, म्हणून अपात्र ठरण्याची भिती आहे.

यासह पुन्हा विवाह आधीचा आणि नंतरच्या नावाचा प्रश्न असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी सेतू चालक देखील चक्रावले आहेत. यासह हे दाखले काढण्यासाठी महसूल विभागाने मुदत ठरवून दिलेली आहे. या मुदतीच्या आधी दाखले न मिळाल्यास महिला मोठ्या संख्याने योजनेपासून वंचित राहण्याची शयता आहे. दरम्यान, सदर योजना राबवतांना येणार्‍या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी आज महिला बालकल्याण विभागासह अन्य यंत्रणांची बैठक बोलवण्यात आलेली आहे. यात योजना राबवतांना येणार्‍या अडचणीवर चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

महसूलच्या डोमेसाईल दाखल्यामुळे बहिण माझी लाडकी योजनेत अडचण होत असल्याची चर्चा महिला वर्गात आहे. उत्पान्नचा व रहिवासी दाखल मिळविण्यासाठी महिलांनी तलाठी कार्यालया बाहेर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या आहेत. तर अनेक सेतू चालकांना या योजनचे माहिती नसल्याची चर्चा आहे.
असा आहे योजनेचा कार्यक्रम
१ जुलैपासून अर्ज करता येणार
१५ जुलै दाखल करण्याची अंतिम तारीख
१६ जुलै रोजी तात्पुरती यादी प्रकाशन
१६ ते २० जुलै दरम्यान तक्रार व हरकत घेता येणार
२१ ते ३० जुलै दरम्यान तक्रारी, हरकतीचे निराकरण
१ ऑगस्ट रोजी अंतिम यादी प्रकाशित
१० ऑगस्ट लाभार्थ्यांचे बँकेमध्ये ई-केवायसी होणार
१४ ऑगस्ट लाभार्थी निधी हस्तांतरण
१५ तारखेपर्यंत निधी लाभार्थ्यांना देण्यात येणार

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...